Illegal Hoardings
sakal
नागपूर
Illegal Hoardings: अवैध होर्डिंगद्वारे ‘शुभेच्छा देणाऱ्यांची’ यादी द्या; उच्च न्यायालय, महापालिकेला आदेश, पाच लाखांच्या दंडाची तंबी
Nagpur News: नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या अवैध होर्डिंगविरोधात उच्च न्यायालयाने महापालिकेला कडक आदेश दिले. सर्व ‘शुभेच्छुकांची’ यादी, नोटिसा आणि पाच लाख दंडाचा प्रस्ताव २२ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी शहरात अवैध होर्डिंग लावणाऱ्यांची यादी सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेला मंगळवारी दिले. यासाठी महापालिकेला २२ डिसेंबरपर्यंतचा अवधी दिला.

