नागपूर सुधार प्रन्यासचा ९२७ कोटींच्या खर्चाचा संकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Improvement Pranyas plans budget of Rs 927 crore 105 crore for road and 10 crore for STP

नागपूर सुधार प्रन्यासचा ९२७ कोटींच्या खर्चाचा संकल्प

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने ९२७ .७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून यातून ५७२ आणि १९०० ले-आउट व्यतिरिक्त नवीन अभिन्यासांमध्ये मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी ६५ कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र गुंठेवारी विकास अंतर्गत ९५ कोटी येणे अपेक्षित असून त्यावरच या वस्त्यांचा विकास अवलंबून राहणार असल्याचे दिसून येते.

सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी प्रन्यासचे विश्वस्त आमदार विकास ठाकरे, संदीप ईटकेलवार, नगररचना विभागाचे सहसंचालक सुप्रिया थुल, महाव्यवस्थापक निशिकांत सुके, अधिक्षक अभियंता लीना उपाध्ये यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रन्यासला येत्या आर्थिक वर्षात घरबांधणीतून १५० कोटी व भूखंड व दुकानाच्या भाडेपट्ट्यांमधून ३५ कोटी येणे अपेक्षित आहे. नासुप्रच्या निधीतून विकासाची विविध कामे व रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १०५ कोटी, प्रन्यासचे दोन विभागीय कार्यालयाच्या इमारती बांधकामासाठी १५ कोटी, दलित वस्ती सुधार योजना, दलितेत्तर वस्ती सुधार योजना, आमदार निधी, खासदार निधी, मौजा मानेवाडा येथील ई-लायब्ररी, इस्लामिक कल्चरल सेंटर, महाराष्ट्र सुर्वण जयंती नगरोत्थान महाअभियान आदींसाठी ४१२ कोटी ७३ लाखांचे प्रावधान केले आहे. जन सुविधा केंद्रांकरिता ३ कोटी, आशीर्वाद नगर, कळमना येथील मार्केटचा विकास करण्याकरिता पाच कोटी रुपये खर्च करण्यात येईल.

वेतनावर ९६ लाखांचा खर्च

सुधार प्रन्यासच्या एकूण उत्पनातून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ९६ लाख रुपये खर्च होणार आहे. तसेच सिवेज ट्रीटमेंट प्लांट व मेन सिवर सांडपाण्याच्या प्रक्रियेसाठी १५ कोटी, खेळाच्या मैदानाचा एकात्मिक विकास, १० कोटी, नवीन रस्ते बांधणीसाठी ५ कोटी खर्च करण्याचे प्रन्यासने ठरविले आहे.

Web Title: Nagpur Improvement Pranyas Plans Budget Of Rs 927 Crore 105 Crore For Road And 10 Crore For Stp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..