Nagpur : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Nagpur : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप ओसरला. मात्र, दर दोन दिवसानंतर चाचण्यांची संख्या वाढली की, कोरोनाबाधितांचा आकडा फुगतो. रविवारी ग्रामीण भागात एकाही नव्या बाधिताची नोंद झाली नाही. मात्र, शहरात ९ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले. केवळ एकाने कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यात सद्या सक्रिय कोरोनाबधितांच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात ४१ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. शहरात २ हजार १६१ व ग्रामीणमध्ये ५८७ अशा जिल्ह्यात २ हजार ७४८ चाचण्या झाल्या. यात शहरातून ९ जणांचे अहवाल बाधित आले. सकारात्मक आलेत. यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ९३ हजार ५१४ झाली तर १ जण कोरोनामुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या ४ लाख ८३ हजार ३५२ वर पोहचली. आतापर्यंत १० हजार १२२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाख ७०हजार ६१० कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

loading image
go to top