नागपूर : खाद्यतेलाचे भाव न परवडणारे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur inflation oil prices hike unaffordable to citizen

नागपूर : खाद्यतेलाचे भाव न परवडणारे!

नागपूर : इंडोनेशियाने पाम तेल निर्यात करण्याची बंदी मागे घेतल्यानंतर देशात सुमारे दोन लाख टन कच्चे पामतेल भारतात पाठवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत भारतात पामतेलाची उपलब्धता वाढेल. त्यामुळे इतर खाद्यतेलाच्या किमतीही कमी होतील, असे बोलले जात होते. मात्र, खाद्यतेलाच्या दरात घट न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही. १५ जूनपर्यंत किरकोळ बाजारात पाम तेल उपलब्ध होईल. यामुळे साबण, शाम्पू, बिस्किटे आणि चॉकलेट यांसारख्या कच्च्या मालाच्या किमती कमी होतील. मात्र, त्याचा ग्राहकांना लाभ होण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.

भारत सुमारे एक लाख ३० हजार टन खाद्यतेल आयात करतो, त्यापैकी सुमारे ८५ लाख टन तेल, किंवा सुमारे ६३ टक्के, पाम तेल आहे. यातील सुमारे ४५ टक्के पामतेल इंडोनेशियातून आणि उर्वरित मलेशियातून येते. अद्याप इंडोनेशियातील खेप भारतात आलेली नसल्याने खाद्यतेलाच्या किमती खाली आलेल्या नाही. केंद्र सरकार मात्र, दर कमी होतील असे म्हणत आहे. मात्र, वाढलेले इंधनाचे दर आणि वाहतूकदारांच्या दरात झालेल्या भाववाढीमुळे जनतेला मोठा दिलासा मिळेल अशी शक्यता कमीच आहे. भारतातील लोक सध्या महागाईचा सामना करत आहेत.

भारत आपले बहुतेक पामतेल इंडोनेशियातूनच आयात करतो. इंडोनेशियाच्या या निर्णयामुळे देशातील पाम तेलाच्या किमती खाली येण्याची शक्यता आहे. पाम तेलाचा वापर मुख्यतः स्वयंपाकात केला जातो. हे इतर तेलांमध्ये देखील मिसळले जात असल्याने दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बाजारात शुकशुकाट

गेल्या आठवड्यात महिन्याची सुरवात असताना बाजारात शुकशुकाट दिसत आहे. त्यामुळे बाजारातील सर्वच धान्यासह तेलाचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहे. सध्या ऑनलाइन, मॉल संस्कृती शहरात बळावू लागली आहे. त्याचाही फटका पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना बसू लागला आहे. त्यामुळेही बाजारातील गर्दी कमी झाल्याचे बाजाराचे अभ्यासक प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Nagpur Inflation Oil Prices Hike Unaffordable To Citizen

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top