Nagpur Sexual Harassment Case
ESAKAL
नागपूर : खाजगी विमा कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी करीत, तसे न केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेने शहरातील अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.