

Nagpur Crime
sakal
नागपूर : एका प्रॉपर्टी डीलरची त्याच्याच भागीदाराने गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १ कोटी रुपयांनी फसवणूक केली. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पोलिसांनी शमी कन्हैयालाल ममतानी (वय ५५, रा. जागृती कॉलनी, काटोल रोड) यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंदविला.