
Nagpur Ippa gang MD Drugs Smuggling: धंतोलीतील एका हॉटेलमध्ये गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत १० लाख ५० हजार रुपये किमतीची एमडी पावडर जप्त केली. याशिवाय आठ तस्करांना अटक केली. मात्र, या तस्करांचे तार शहरातील मोमीनपुरा परिसरातील ‘इप्पा’ गॅंगशी जुळले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांकडून अधिक तपासासाठी मुंबईला पथक पाठविण्यात येणार आहे.
धंतोलीतील एका हॉटेलमध्ये तस्करांच्या बैठकीत विक्रीसाठी आलेल्या अंमली पदार्थाच्या वाटाघाटी सुरू असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता.२६) छापा टाकून १० लाख ५० हजार रुपये किंमतीची एमडी पावडर जप्त केली. यावेळी मोहम्मद मुस्तफा ऊर्फ सानू जमील पठाण (वय ४२, रा.डोबीनगर), सरफराज नूर खान (वय ३६, रा.टिमकी), मुन्नात सत्तार खान (वय ३२ रा. भांडेवाडी), अंकित अशोक केशरी (वय ३१, रा.रनाळा), अश्विन विनोद तुर्केल (वय३२, रा.गोकुळपेठ), परवेज फिरोज खान (वय २७, रा.अन्सारनगर), सय्यद इमरान ऊर्फ इम्मू सय्यद जमील (वय २८) आणि नागेंद्र गोमराव आठणकर (वय ५५ रा. पार्वतीनगर, मानेवाडा) याला अटक केली.
सैयद इमरानने मुंबईवरून ड्रग्स बोलावले होते. सर्व आरोपी कुख्यात असून गांजा आणि ड्रग्स तस्करीत सक्रिय आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, ते इप्पा गॅंगशीही संबंधित असल्याची माहिती आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान धंतोली पोलिसांनी अटकेतील तस्करांना बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. त्यामुळे कोठडीत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
हॉटेल होणार सील, आयुक्तांचे आदेश
गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकल्यावर बुधवारी (ता.२७) पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दुपारी लोहारकर हॉटेलमधील खोलीची पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून कारवाईची माहिती घेत हॉटेल सील करण्याचे निर्देश दिले. सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, लवरकच हॉटेल सील करण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.