Vivek Palatkar Case: विवेक पालटकरला उच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच, मुलगा अन् बहिणींसह ५ जणांची केली होती क्रूर हत्या

स्वतःचा मुलगा व बहिणीसह पाच जणांची क्रूरपणे हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक पालटकरची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली.
Nagpur Crime
Nagpur Crime Esakal

Vivek Paltkar killed Five Family Members: स्वतःचा मुलगा व बहिणीसह पाच जणांची क्रूरपणे हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक पालटकरची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. यापूर्वी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने विवेक पालटकरला फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्या शिक्षेला त्याने आव्हान दिले होते.

विवेकने एकाच रात्री बहीण, जावयासह पाच जणांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले होते. मृतांमध्ये कमलाकर मोतीराम पवनकर (वय ४८), त्यांच्या पत्नी व विवेकची बहीण अर्चना (वय ४५), कमलाकर यांच्या आई मीराबाई (वय ७३), मुलगी वेदांती (वय १२, सर्व रा. दिघोरी) व विवेकचा मुलगा कृष्णा (वय ५) यांचा समावेश होता. दिघोरीतील आराधनानगरात पवनकर कुटुंब राहत होते. कमलाकर पवनकर प्रॉपर्टी डीलर होते. आरोपी विवेकला पत्नीच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यामुळे आरोपीची मुले वैष्णवी (वय ८) व कृष्णा (वय ५) हे २०१४ पासून मृत कमलाकर पवनकर यांच्याकडे राहत होते.

आरोपी विवेकला न्यायालयातून सोडविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. मात्र, आरोपी त्याच्याकडे नवरगाव येथे वडिलोपार्जित दहा एकर शेती असतानाही पैसे परत करत नव्हता. त्यावरून दोघांमध्ये घटनेच्या आठ दिवस आधीपासून वाद सुरू होता. त्यातूनच ११ जून २०१८ रोजी मध्यरात्रीनंतर आरोपीने निर्दयीपणे लोखंडी सब्बलीने एकामागे एक असे पाच जणांच्या डोक्यावर प्रहार करून झोपेतच त्यांना संपवले. हत्याकांडाची घटना दुर्मीळातील दुर्मीळ असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी विवेकला फाशीची शिक्षा ठोठावली होती.(Latest Marathi News)

त्यामुळे ही शिक्षा कायम ठेवण्यात यावी यासाठी राज्य सरकारने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. ही शिक्षा कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. आरोपी विवेक पालटकर यानेही फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. पालटकर याचे कृत्य विकृत स्वरूपाचे आहे. अशाप्रकारचे लोक समाजासाठी विघातक आहेत. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा देणे गरजेचे आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. न्या. विनय जोशी आणि न्या. महेंद्र चांदवानी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

Nagpur Crime
Heeramandi The Diamond Bazaar: ठरलं! हीरामंडी 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, संजय लीला भन्साळींच्या मास्टरपीसची रिलीज डेट जाहीर

मुलगी आणि भाचीची साक्ष महत्त्वाची

या प्रकरणात एकूण २९ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. या प्रकरणात विवेकची मुलगी आणि भाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होत्या. दोन्ही मुलींनी हिंमत दाखवत विवेकची क्रूरता कथन केली होती. या खटल्यात त्याची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यांच्याशिवाय पवनकर कुटुंबातील शेजारील दाम्पत्याची साक्षही महत्त्वाची ठरली. ज्याच्या आधारे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पीडित कुटुंबाच्या वतीने डॉ. मोहम्मद अतिक यांनी बाजू मांडली. (Latest Marathi News)

असा आहे खटल्याचा घटनाक्रम

  • घटना घडली १० जून २०१८ रोजी

  • कनिष्ठ न्यायालयात ५ वर्षे सुनावणी

  • संपूर्ण प्रकरणात २९ साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले.

  • १ एप्रिल २०२३ रोजी कनिष्ठ न्यायालयाकडून फाशीची शिक्षा

  • उच्च न्यायालयात वर्षभर चालला खटला

  • येरवडा कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी

  • २७ मार्च २०२४ रोजी हायकोर्टाकडून फाशी मंजूर

Nagpur Crime
Navneet Rana: 'अशी लाचारी कोणावरही येऊ नये'; नवनीत राणांना पाडणार, बच्चू कडूंनी केला निर्धार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com