

Nagpur police investigate threat letters demanding ₹10 lakh each from eight jewellers in Gandhibagh.
sakal
नागपूर, : लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने गांधीबाग परिसरातील आठ सराफा व्यापाऱ्यांना खंडणीची धमकी दिल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांच्यासह आठ सराफा व्यापाऱ्याकडे १० लाख रुपयांच्या मागणीचे पत्र आले होते. तीन दिवसांत पैसे न दिल्यास कुटुंबीयांसह जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला होता.