esakal | शिक्षण सभापतींचे अध्यक्षांना आव्हान! वाद चव्हाट्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

शिक्षण सभापतींचे अध्यक्षांना आव्हान! वाद चव्हाट्यावर

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष रश्मी बर्वे व शिक्षण सभापती भारती पाटील यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरु झाल्याने दोंघीमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीच्या वेळीच भारती पाटील यांनी शिक्षण समितीची वेगळी बैठक आयोजित करून एकप्रकारे त्यांनी अध्यक्षांना आव्हानच दिले.

जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभेनंतर स्थायी समिती मोठी आहे. स्थायी समितीच्या बैठकीला मंत्रिमंडळाची बैठकच समजण्यात येते. याला सर्व सभापती, सीईओ, विभागप्रमुख उपस्थित असते. महत्‍त्वाच्या विषय येथे हाताळले जातात. परंतु दोन दिवसापूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीच्या वेळी सभापती भारती पाटील यांनी शिक्षण समितीची बैठक आयोजित करून स्थायी समितीसोबतच अध्यक्षांनाच एकप्रकारे आव्हान दिले. कारण स्थायी समितीच्या बैठकीला शिक्षण विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता.

हेही वाचा: नागपूर : दिव्यांग राष्ट्रीय खेळाडूची फरफट

गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यात धुसफुस सुरू आहे. शिक्षण समितीने मंजूर केलेल्या पॉलिमर दप्तरच्या वाटपाला स्थगिती अध्यक्षांनी दिलेली स्थगिती आणि गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर अध्यक्षांच्या नावाला वगळण्याचा घटनेने त्यात आणखीनच भर घातली. पॉलिमर दप्तर वाटप सभापतींचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. अवतरण प्रत निघाल्यावर अध्यक्षांनी दप्तर वाटपाच्या विषयाला स्थगिती दिल्याने त्या चांगल्याच चिळल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीही दोघांमध्ये शीत युद्ध सुरू होते. काही कार्यक्रमाला दोघांनीही सोबत जाण्याचे टाळल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक व नाना गावंडे यांचे गट सक्रिय आहे. जिल्हा परिषदेत केदार गटाचे वर्चस्व आहे.

महत्त्वाच्या पदांवर त्यांच्याच गटातील सदस्य आहे. अध्यक्षा बर्वे या केदार तर पाटील या नाना गावंड गटाच्या आहेत. त्या एका गटातील सदस्य दुसऱ्या गटातील सदस्यांना फारसे महत्त्व देत नाही. शिक्षण समितीत केदार गटातील काही सदस्यांकडून उचलण्यात आलेल्या मुद्यांमुळे सभापती पाटील चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. त्यांच्या अनेक विषयांवर त्यांच्याकडून आक्षेप घेण्यात आल्याने त्या अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे अध्यक्षांच्या माध्यमातून थेट केदार गटाला त्यांनी आव्हान दिल्याची चर्चा आहे.

loading image
go to top