Electric Shock: विजेचा धक्का लागून म्हाडा कॉलनीतील वृद्धेचा मृत्यू: कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली
Nagpur News: नागपूरच्या कळमना परिसरात इलेक्ट्रिक हिटरला स्पर्श झाल्याने ९५ वर्षीय वृद्धेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. कळमना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नागपूर : कळमना पोलिस ठाणे हद्दीतील म्हाडा कॉलनीत इलेक्ट्रिक हिटरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.२०) सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.