कंगनाच्या ‘भीक’मुळे सिनेट बैठकीत गदारोळ |Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिनेट बैठकीत गदारोळ

नागपूर : कंगनाच्या ‘भीक’मुळे सिनेट बैठकीत गदारोळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिने वादग्रस्त विधान केले आहे. १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य भीक असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून आज झालेल्या सिनेट बैठकीत गदारोळ झाला. सदस्यांनी कंगनाच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला.

सिनेट सदस्य दिनेश शेराम यांनी स्वातंत्र्याच्या अमृतासंदर्भात विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव मांडला. यावर ज्येष्ठ सदस्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी कंगनाच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हटले की, सरकारकडून पद्मश्री मिळालेली व्यक्ती हे स्वातंत्र्य ‘भीक मागून मिळाले’ असे म्हणत असेल तर या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव का साजरा केला जात आहे? अशी दुर्दैवी टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने सिनेटने निषेध करीत, पद्मश्री परत घेण्याचा प्रस्ताव पास करायला हवा.

हेही वाचा: परळीत एसटीचे दहा कर्मचारी निलंबित

मात्र, अभाविपच्या वतीने सिनेट सदस्य विष्णू चांगदे यांनी शैक्षणिक विषयांशी संबंधित निर्णय विद्यापीठ सिनेट घेते. त्याचा याचेशी संबंधित नसलेल्या व्यक्ती आणि विधाने गृहीत धरू नयेत असे मत मांडले. महात्मा गांधी, वीर सावरकर आणि इतर महापुरुषांच्या विरोधातही अनेक विधाने केली जातात. त्या सर्व विधानांवर सिनेट निषेधाचा ठराव मांडणार का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. मात्र, त्यावर डॉ. तायवाडे यांनी कंगनाचे विधान वैयक्तिक नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्या सर्वांचा अपमान असल्याचे म्हटले. इतर सदस्यांनीही भावना व्यक्त केल्या. शेवटी कंगना राणावतचा निषेध करीत त्यावरील चर्चा संपुष्टात आणली.

loading image
go to top