Nagpur Factory Blast
esakal
नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे रविवारी बारुद कंपनीत भीषण स्फोटाची घटना घडली होती. या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर काही जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर आता मृतकांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. या स्फोटात गोपी कुवे नावाच्या महिलेचाही मृत्यू झाला आहे. रविवारी गोपी यांचा कंपनीतील शेवटचा दिवस होता; मात्र या दुर्दैवी घटनेनंतर कंपनीतील शेवटचा दिवस त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला.