

Nagpur Crime News Accused Stabs Oil Masseur Three Times Allegedly Over Court Testimony In Earlier Assault Case
esakal
नागपूर: हल्ल्याच्या गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या कारणाहून काटोलमधून हद्दपार केलेल्या आरोपीने तेलमालीश करणाऱ्यावर पाठीमागून चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले. ही घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टी पॉइंट जवळच्या बालाजी आयुर्वेदिक औषधी दुकानाजवळ रविवारी (ता.२७) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीला वाडी पोलिसांनी अटक केली.