

Awake craniotomy successfully performed in Nagpur.
Sakal
नागपूर : मेंदूतील गाठ काढायची; मात्र त्याचवेळी हाताची हालचाल नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागाला कोणतीही इजा होऊ द्यायची नव्हती. एक छोटीशी चूक रुग्णाच्या आयुष्यावर परिणाम करू शकणाऱ्या या अत्यंत नाजूक परिस्थितीत डॉक्टरांनी मोठे आव्हान स्वीकारले. रुग्णाला जागे ठेवत, त्याच्या हाताच्या हालचाली तपासत मेंदूतील गाठ काढण्याची अत्यंत दुर्मिळ ‘अवेक क्रॅनियोटॉमी’ शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वी केली.