esakal | पारडसिंगा : मरणासन्न अवस्थेतील दीडशे गोमातांना जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

cow

पारडसिंगा : मरणासन्न अवस्थेतील दीडशे गोमातांना जीवदान

sakal_logo
By
सुधीर बुटे

काटोल : तालुक्यातील पारडसिंगा येथील श्री सती अनसूया माता देवस्थान धार्मिक उत्सवासाठी जसे प्रसिद्ध आहे तसेच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. येथील गोरक्षणाने अनेक गो-मातांना जीवदान दिले. त्यांची देखभाल करून देशी गायींच्या वाणाला जिवंत ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ३७५ जनावरांपासून निघणाऱ्या शेणापासून पेंट तयार करण्याचा प्रकल्प येणाऱ्या काळात संस्थान सुरू करणार आहे. तर गोमुत्रावरही प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येईल.

पूर्व विदर्भातील पारडसिंगा येथील श्री सती अनसूया माता देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याअंतर्गत गोरक्षण सेवा रूपी कार्य अनेकांना मोहित करणारे आहे. सन २०११ मध्ये केवळ दोन-चार गुरांना घेऊन सुरू झालेल्या गोरक्षणमध्ये सध्या ३०० गायी आहेत. तर एक वर्षाची ४० तर २ वर्षांची ३५ वासरे व कालवडी आहेत. गुरांना ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यासाठी तीन मोठे शेड आहेत. पहिल्या शेडमध्ये दुभती जनावरे, दुसऱ्या शेडमध्ये गर्भवती व तिसऱ्या शेडमध्ये उर्वरित गुरे ठेवली आहेत.

हेही वाचा: नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार;पाहा व्हिडिओ

स्वच्छता व्यवस्थापन

मोठ्या संख्येने असलेल्या गुरांची व्यवस्था करणे साधे काम नाही. यासाठी अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. सकाळी गुरे चराईला गेल्यानंतर तिन्ही शेडचे शेण नियोजित ठिकाणी गोळा केले जाते. त्यानंतर शेड स्वच्छ केले जाते. सायंकाळी दूध काढणे, वासरांना जास्तीत जास्त दूध पिण्यास देणे, चाऱ्याची व्यवस्था नियमित केली जाते.

१६० एकरांत चाऱ्याचे उत्पादन

गुरांना पावसाळा व हिवाळ्यात केवळ हिरवा चारा उपलब्ध होण्यास संस्थान प्रयत्नशील आहे. शेड परिसरातील १०० एकर जागा भाडे तत्त्वावर घेण्यात आली. शेतीचा सातबारा घेऊन एक वर्षाकरिता करार करण्यात आला. संस्थान यावर अडीच लाख खर्च करते. या शेतातील कुरण (चारा) गुरांना देण्यात येतो. तसेच संस्थांच्या ६० एकर जागेत हिरवा चारा तयार केला जातो. गुरांना नियमित हिरवा चारा मिळावा यासाठी संस्थान प्रयत्नशील आहे.

हेही वाचा: "नितीन गडकरींच्या दत्तक नगरपरिषदेला 2 वर्षांपासून निधीच नाही";पाहा व्हिडिओ

राजस्थानमधून बोलावले साहित्य

गोरक्षण केंद्र दिवसेंदिवस वाढत असून, मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या शेणापासून पेंट तयार करण्याचा कारखाना तयार करण्याचा संस्थानचा मानस आहे. यासाठी राजस्थानमधून साहित्य बोलविण्यात येणार आहे. याशिवाय गोमूत्र प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येईल. गावरान गायींची संख्या वाढविण्यासाठी कृत्रिम रेतन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. आगामी काळात या प्रकल्पावर वेगाने काम करण्यात येणार आहे

- चरणसिंग ठाकूर, अध्यक्ष, संस्थान

खरीप, रब्बी पिके घेतली जातात

खरीप पिके जसे मका, ज्वारी, तूर, तर रब्बीमध्ये गहू, हरभरा आदी पिके घेतली जातात. धान्य संस्थानच्या अन्नकूटमध्ये तर वाळलेला चारा गुरांकरिता वापरला जातो. हा चारा आवडीने खाण्यासाठी गव्हांडा टाक्यात स्वच्छ करून त्यात ढेप, चुरी, मीठ व गूळ आदींचे मिश्रण करून उन्हाळ्यात जनावरांना दिला जातो.

- किशोर गाढवे, विश्वस्त

हेही वाचा: अर्धी उपराजधानी होती अंधारात! बिघाड शोधण्यासाठी लागला दीड दिवस

मरणासन्न गुरांना जीवनदान

कसायाकडे जाणारी जनावरे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यावर त्यांना गोरक्षण केंद्राला पाठविले जाते. खचाखच भरलेल्या वाहनातील जनावरे मरणासन्न स्थितीत असतात. कधी जेसीबीच्या साह्याने उतरविले जातात. यात काहींचा जीवही जातो. आशा मरणासन्न अवस्थेतील जनावरांना वाचविणे, त्यांना जीवदान देण्याचे कार्य अध्यक्षांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

- महेंद्र खंडाईत, विश्वस्त, पारडसिंगा

गरजू शेतकऱ्याला गोऱ्हांचा पुरवठा

गोरक्षण केंद्रातून मिळणारी वासरे गरजू शेतकऱ्यांनी मागितली तर त्यांना त्यांची पडताळणी करून निःशुल्क दिली जातात. वासरांना सशक्त करण्यासाठी जास्तीत जास्त दूध दिले जाते. मोठ्या प्रमाणात मिळणारे शेणखत संस्थांच्या शेतात वापरून सेंद्रिय शेतीतून मोठी पिके घेतली जातात.

- वैभव वीरखरे, पारडसिंगा

loading image
go to top