
Nagpur Elections
sakal
नागपूर : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार असून, १५ नगरपरिषद आणि १२ नगरपंचायतींमध्ये सत्ता कोणाच्या हातात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर करताच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. युती-आघाड्यांच्या चर्चा व कार्यकर्त्यांच्या हालचालींना वेग आला आहे.