Nagpur Lok Sabha Election : नितीन गडकरींचा करिष्मा! नागपुरात राहणार विकासाची गंगा

भारतातील हेविहेट उमेदवार, विकासपुरूष म्हणून नावारूपास आलेले अजातशत्रू नितीन गडकरी आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आमदार विकास ठाकरे यांच्यात लढत होत आहे.
bjp nitin gadkari congress vikas thackeray
bjp nitin gadkari congress vikas thackeraysakal

नागपूर - भारतातील हेविहेट उमेदवार, विकासपुरूष म्हणून नावारूपास आलेले अजातशत्रू नितीन गडकरी आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आमदार विकास ठाकरे यांच्यात लढत होत आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये गडकरी यांचा एकतर्फी विजय झाला होता. शहराचा चेहरामोहरा बदलण्यात मोलाची भूमिका बजावणारे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी लोकशाहीच्या या युद्धात नागपूरकरांच्या मनात धाकधूक मात्र, कायम आहे.

काँग्रेसचा गड राहिलेल्या नागपुरातील राजकीय समीकरण २०१४ पासून पार बदलून गेले. पाच पाच वेळा काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतदान करणारी जनता तब्बल दोन वेळा भाजपला निवडून देईल, असे कुणालाही वाटले नसेल. नितीन गडकरी विधानसभेची एक निवडणूक वगळता एकदाही थेट मैदानात उतरले नव्हते. पण, २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचंड मतांनी पराभव केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वलय असले तरी गडकरींचे विजय हे कुणाच्या वलयामुळे नव्हे तर त्यांचा एकूणच राजकीय इतिहास आणि १९९५ ते १९९९ या काळात त्यांनी केलेली विकासकामांमुळे झाले होते. गेल्या दहा वर्षांमध्ये नितीन गडकरी यांनी उपराजधानीचा चेहरामोहराच बदलून टाकला.

विशेष म्हणजे त्यांची विकासाची कामे ही डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविणारी, तुंबलेल्या नाल्या साफ करणारी, भूमीपूजन करून फलक लावण्यापूरती मर्यादित नसतात तर त्यामागे पन्नास-शंभर वर्षांचे दीर्घकालीन नियोजन असते. शहरातील चकचकीत रस्ते, सुशोभीकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, उड्डाण पूल, मेट्रो आदी नागरिकांनी दिसून येणारी कामे ही त्यांच्या दीर्घकालीन नियोजनाची उदाहरणे आहेत. निवडणूक जिंकण्यापूरती आश्वासने देण्याचे धंदे त्यांनी कधीच केले नाहीत.

२०१४ च्या निवडणुकीत गडकरी यांनी विलास मुत्तेमवार यांचा सहज पराभव केला होता. एवढा मोठा झालेला पराभव पाहून काँगेस गर्भगळीत झाली. परिणामी २०१९ च्या निवडणुकीत शहरातील एकही सक्षम उमेदवार न भेटल्याने नाना पटोलेंना रिंगणात उतरविले. तरीही सुमारे सव्वादोन लाखांच्या मताधिक्यांनी गडकरी विजयी झाले होते.

नागपूरच्या निकालाबाबत उत्सुकता

केंद्रीय रस्ते, महामार्ग मंत्री म्हणून गेल्या दहा वर्षांत नितीन गडकरी यांनी देशभरात जी प्रचंड कामे केली आहेत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात ते लोकप्रिय झाले आहेत. विकासपुरूष म्हणून त्यांची प्रतिमा झाली आहे. संसदेत अनेकवेळा विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही गडकरी यांच्या विकासकामांची स्तुती केली आहे.

त्यामुळे वाराणसी, अमेठी, रायबरेली, वायनाड, हैदराबाद या बहुप्रतिक्षित लोकसभा मतदारसंघांप्रमाणे नागपूरच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. सोबतच संघाचे मुख्यालयही उपराजधानीत असल्याने सर्वांच्या नजरा नागपूरकडे असतील.

विकास ठाकरेंच्या रूपाने तगडा प्रतिस्पर्धी

२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांच्या रूपाने तगडा उमेदवार उभा केला. परिणामी ही निवडणूक मागील दोन निवडणुकांप्रमाणे एकतर्फी होणार नसल्याचे बोलले जाते. विकास ठाकरे यांची नाळ सामान्यांशी जुळलेली आहे. कधीही उपलब्ध असणारा ‘आपला माणूस’ अशी त्यांची प्रतिमा आहे.

विशेष म्हणजे नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांचे संबंधही चांगले आहेत. पण, लोकशाहीत निवडणुकीच्या मैदानात अशा संबंधांना महत्त्व नसते. कोण निवडून येणार हे शेवटी जनताच ठरविणार आहे.

निकालावर परिणाम करणारे घटक

  • शहरातील विकासाची कामे

  • नितीन गडकरी यांचा वैयक्तिक करिष्मा

  • जातीय ध्रुवीकरण टळले

  • घसरलेला मतदानाचा टक्का

  • कडक उन्हामुळे मतदानाप्रती नागरिकांची उदासीनता

  • लढवय्या नेता म्हणून आमदार विकास ठाकरे यांची प्रतिमा

  • मुस्लिम आणि एससी मतांचा निश्चित अंदाज न लागणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com