Nagpur : इंद्रप्रस्थनगर नावावरून महाभारत!

नागरिकांनी सुचविलेल्या नावाला बगल ; मनपा जातीवाचक वस्त्यांची नावे बदलणार
nagpur
nagpursakal
Updated on

नागपूर : नागरिकांनी सर्वेक्षण केल्यानंतर मरारटोली या वस्तीचे नाव इंद्रप्रस्थनगर करण्याबाबत झोन कार्यालयाला सूचना दिली. परंतु नागरिकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवत महापालिकेने वेगळेच नाव प्रस्तावित केले. त्यामुळे मरारटोलीतील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. महापालिका अधिकाऱ्यांनी कुणाच्या दबावात इंद्रप्रस्थनगर नावाला बगल दिली?, महापालिकेला लोकांच्या सूचनांचा आदर नाही तर कशाला मागितल्या, असा सवालही नागरिकांनी केला असूनही आणखी काही वस्त्यांच्या प्रस्तावित नावावरून महाभारत होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यासंदर्भात आदेश काढल्यानंतर महापालिकेने शहरातील जातीवाचक नावे असलेल्या ६६ वस्त्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू केली. गेल्या आठ दिवसांपूर्वी महापालिकेने नाव बदलण्यात येणाऱ्या वस्त्यांची नावे जाहीर केली.

nagpur
मेडिकल कचरा मेळघाटच्या जंगलात; नागरिकांसह वन्यप्राण्यांचे आरोग्य धोक्यात

तसेच या वस्त्यांना देण्यात येणारी नावेही जाहीर केली. महापालिकेच्या स्लम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नागरिकांकडून हरकती, सूचनाही मागविण्यात आल्या. परंतु महापालिकने सूचना मागविण्यापूर्वीच राज्य सरकारच्या जातीवाचक नाव बदलण्याच्या आदेशावरून सामाजिक न्याय विभागाने ६ ऑगस्टला एक सभा घेतली. या नगरसेवकांनी पुढाकार घेत योग्य नावे सुचविण्याचे आवाहन केले. यात चार नावे पुढे आली. त्यामुळे एका नावावर सहमती व्हावी, या उद्देशाने मरारटोलीतील नागरिकांनी नव्या चार नावावर जनमत घेतले. यात ८५ टक्के नागरिकांनी मरारटोलीचे नाव इंद्रप्रस्थनगर करण्यात यावे, यावर शिक्कमोर्तब केले. इंद्रप्रस्थनगर नावाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्त, मनपा नगर रचना विभाग, धरमपेठ झोनला पाठविण्यात आला.

परंतु नागरिकांनी निवडलेल्या नावालाच महापालिकेने बगल दिल्याचे जाहीर नवीन नावांच्या यादीवरून दिसून येत आहे. त्यामुळे मरारटोलीतील नागरिकांत संताप आहे. नागरिकांची सभा घेतली, चार नावांपैकी एकावर सहमती करण्यासाठी सर्वेक्षण केले, इंद्रप्रस्थनगर नावाचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया केली. यासाठी वेळ काढला, परंतु आता प्रस्तावित नावात धरमपेठ झोनअंतर्गत इंद्रप्रस्थनगराचे नावच नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर आहे. ‘त्या’ वस्तीचेही नाव नाही धरमपेठ झोनअंतर्गत १६ ऑगस्टला सुरेंद्रगढ परिसरातील गोंड मोहल्ल्याचे नामकरण नागरिकांनीच भगवान बिरसा मुंडानगर असे केले.

याबाबत महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचीही भेट घेतली. त्यांनी आक्षेप, हरकती नोंदविण्याचा सल्ला दिला. परंतु या प्रक्रियेपूर्वीच आम्ही झोनला, आयुक्तांना मरारटोलीचे नामकरण इंद्रप्रस्थनगर करण्याबाबत पत्र दिले होते. त्या नावाचा विचारही केला दिसत नाही.

- ॲड. अशोक अग्रवाल, मरारटोली

आता महापालिकेने नव्या प्रस्तावित नावाच्या जाहीर केलेल्या यादीत धरमपेठ झोनअंतर्गत या वस्तीचेही नाव नाही. नागरिकांनी नामकरण केलेले नाव महापालिकेला मान्य आहे, असे यातून दिसून येत आहे. परंतु मरारटोलीतील नागरिकांनी निवडलेल्या इंद्रप्रस्थनगर या नावाला का बगल दिली जात आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाव बदलण्यास विलंब महापालिका क्षेत्रातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यासाठी १५ ऑगस्ट ही ‘डेडलाईन'' होती. परंतु महापालिकेने या प्रक्रियेलाही विलंब केल्याचे दिसून येत आहे. विलंबानंतर जाहीर केलेली यादी व नागरिकांनी सूचना केलेली नावे, यात तफावत असल्यामुळे महापालिकेने नागरिकांच्या मताला किंमत दिली नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे वस्त्यांच्या नावावरून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. दहा जणांनी नोंदविली सूचना, हरकत महापालिकेने जाहीर केलेल्या वस्‍त्यांच्या नावावर आतापर्यंत दहा जणांनी हरकती नोंदविल्या असल्याचे मनपातील सूत्राने सांगितले. एका वस्तीतील वेगवेगळ्या नागरिकांनी वेगवेगळी नावे सुचविली. त्यामुळे महापालिका प्रशासनापुढेही पेच निर्माण झाला आहे. शिवाय मनपातील पदाधिकारीही हस्तक्षेप करीत असल्याने अधिकाऱ्यांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. इंद्रप्रस्थनगर या नावासाठी मरारटोलीतील नागरिकांचे बहुमत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com