Nagpur: आता किराणा दुकानातही भरता येणार वीज बिल! महावितरणची खास सुविधा, दुकांनदारांना होणार 'हा' फायदा

पूर्वी वीज बिल भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंट प्रणालीमुळे नागरिकांना रांगेत राहण्याची गरज नाही. आता किराणा आणि औषधांच्या दुकानातही विजेचे बिल भरता येणार आहे.
Nagpur: आता किराणा दुकानातही भरता येणार वीज बिल! महावितरणची खास सुविधा, दुकांनदारांना होणार 'हा' फायदा

Nagpur electricity bill payment on Grocery Shop: पूर्वी वीज बिल भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंट प्रणालीमुळे नागरिकांना रांगेत राहण्याची गरज नाही. आता किराणा आणि औषधांच्या दुकानातही विजेचे बिल भरता येणार आहे. महावितरणने ग्राहकांच्या सुविधेसाठी ‘पेमेंट वॉलेट’ सेवा आणली आहे.

वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने स्वतःची पेमेंट वॉलेट यंत्रणा विकसित केली आहे. किराणा दुकानदार, जनरल स्टोअर्स चालक, औषधांचे दुकान आणि पतसंस्थेला वॉलेटधारक होता येणार आहे.

शहरासह ग्रामीण भागातील येणारी अडचण लक्षात घेऊन महावितरणने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या धारकांना महावितरण प्रतिबिलामागे ५ रुपये देईल. यातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास महावितरणला आहे. (Latest Marathi News)

रोजगाराची संधी

कोणतीही सज्ञान व्यक्ती, दुकानदार, व्यापारी, वीज मीटर रीडिंग करणारी संस्था, महिला बचत गट, लघुउद्योजक महावितरणचे वॉलेटधारक होऊ शकतात. महिनाअखेरीस कमिशन अर्जदाराच्या वॉलेटमध्ये जमा होईल. यामुळे ग्रामीण भागात युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास महावितरणला आहे.

Nagpur: आता किराणा दुकानातही भरता येणार वीज बिल! महावितरणची खास सुविधा, दुकांनदारांना होणार 'हा' फायदा
ठाकरेंना पहिला धक्का! शिंदेंची गटनेते पदावरून केलेली हकालपट्टी विधानसभा अध्यक्षांनी नाकारली

दुकानदारांसह व्यक्तिगत युवकही पेमेंट वॉलेटसाठी अर्ज करू शकतात. ग्रामीण भागात यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होऊन अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे- योगेश विटणकर,

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी- महावितरण, नागपूर

‘पेमेंट वॉलेट’मध्ये असे होता येणार सहभागी

पारदर्शक पेमेंट वॉलेट योजनेत सहभागी होणाऱ्यास अर्जासह आवश्यक कागदपत्रांची पुर्तता महावितरणच्या संबंधित कार्यालयात सादर करावी लागणार आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर अर्जदाराला ई-मेल व एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळेल. वॉलेटधारक महावितरणच्या ॲपमध्ये नोंदणी करून ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करू शकतील. ग्राहकांनाही पैसे भरण्याचा मेसेज महावितरणकडून मिळणार आहे. (Latest Marathi News)

Nagpur: आता किराणा दुकानातही भरता येणार वीज बिल! महावितरणची खास सुविधा, दुकांनदारांना होणार 'हा' फायदा
Shiv Sena MLA Disqualification Result: शिंदेंची सेना जिंकली! 16 बंडखोर आमदार ठरले पात्र, नार्वेकरांचा मोठा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com