Haj Yatra Fraud: हज यात्रेच्या नावाखाली फसवणूक, ८२ लाखांनी घातला गंडा; तिघांविरोधात गुन्हा दाखल

हज यात्रेला जाण्यासाठी टुअर्स कंपनीकडे पैसे दिल्यानंतरही त्यांना हज यात्रेला न पाठविता ८२ लाख ८५ हजारांनी गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे.
Haj Yatra Fraud: हज यात्रेच्या नावाखाली फसवणूक, ८२ लाखांनी घातला गंडा; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Person Frauded For 82 Lakhs Pretexting Haj Yatra: हज यात्रेला जाण्यासाठी टुअर्स कंपनीकडे पैसे दिल्यानंतरही त्यांना हज यात्रेला न पाठविता ८२ लाख ८५ हजारांनी गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नसीम अख्तर मोहम्मद हनिफ (वय ६९, रा.बुनकर कॉलनी, कामठी), अब्दुल अजीज शकील अहमद (वय ४२ रा. मर्चंटनगर, मालेगाव), मोहम्मद असलम हफीज अब्दुल अजीज (वय ६०, रा. लकडगंज) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूर मोहम्मद कलीम अख्तर अन्सारी (वय ४२ रा. फुटाणा ओळ, कामठी) यांची अल हिजाज अॅण्ड रमराह टुअर्स कंपनी आहे.

याशिवाय नसीम हा तयबा हज अॅण्ड उमराह टुअर्स कंपनीचा एजंट आहे. टुअरच्या माध्यमातून भाविकांना हज यात्रेसाठी पाठविण्यात येते. यासाठी त्यांनी नसीम यांना संपर्क साधला. त्यांनी नूर यांना भाविकांचे पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार, नूर यांनी हज यात्रेसाठी भाविकांकडून घेतलेले ८२ लाख ८७ हजार रुपये रनाळा येथील बँक खात्यातून तयबाच्या बँक खात्यात पाठविले. (Latest Marathi News)

मात्र, पैसे जमा झाल्यानंतरही या कंपनीने भाविकांना हज यात्रेला पाठविले नाही. त्यामुळे नूर यांनी पैसे परत मागितले असता आरोपींनी कट रचून त्यांच्या विरोधातच पोलिसांत तक्रारी केल्या. नूर यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर कामठी पोलिसांनी कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Haj Yatra Fraud: हज यात्रेच्या नावाखाली फसवणूक, ८२ लाखांनी घातला गंडा; तिघांविरोधात गुन्हा दाखल
Archana Patil: महायुतीचा धारशिवचा उमेदवार अखेर ठरला! ओमराजे निंबाळकरांविरोधात लढणार अर्चना पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com