Nagpur Crime: नागपूर हिवरीनगरात दारूच्या वादातून ३२ वर्षीय युवकाचा डोक्यात दगड लागून दुर्दैवी मृत्यू
Nagpur News: नागपूरच्या हिवरीनगर झोपडपट्टीत मित्रांसोबत दारू पित असताना झालेल्या वादातून ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. आरोपी व्यक्तीवर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नागपूर : मित्रांसोबत दारू पित असताना झालेल्या वादातून एकाने डोक्यात दगड हाणल्याने ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.१२) मध्यरात्रीच्या सुमारास हिवरीनगर झोपडपट्टी, जयभीम चौकात उघडकीस आली.