Young Woman Found Dead in Nagpur Home
esakal
नागपूर : मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनी परिसरात २३ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीने आत्महत्या केलेली नसून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाल्याने मानकापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.