
नागपूर : पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ आणि सामाजिक महत्त्व असलेला मारबत, बडग्या उत्सव शनिवारी (ता. २३) नागपूरकरांच्या अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. नेहरू पुतळा चौकात काळी आणि पिवळी मारबतचे मिलन झाले यावेली उत्साहाला उधाण आले होते. प्रथेप्रमाणे, पोळ्याच्या करीला (पाडवा) निघणाऱ्या या मिरवणुकीने देशाचे हृदयस्थान असलेल्या नागपूरचा सांस्कृतिक वारसा पुन्हा एकदा अधोरेखित केला.