Who Will Be Nagpur Mayor?
esakal
Four BJP leaders are in contention for Nagpur Mayor : नागपूर मनपा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळालं आहे. त्यानंतर नागपूरमध्ये भाजपचा महापौर होईल, हे निश्चित आहे. अशातच काल महापौर पदाचं आरक्षण देखील जाहीर झालं आहे. खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी ही जागा राखीव असून नागपूरचा महापौर कोण होणार? याकडे सर्वांच लक्ष आहे. नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहर आहे. त्यामुळे इथे महापौर कोण होणार? याची सर्वांनाच उत्सूकता लागली आहे.