esakal | नागपूर : मेडिकलमध्ये रंगला डॉक्‍टरांच्या उसनवारीचा खेळ
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

मेडिकलमध्ये रंगला डॉक्‍टरांच्या उसनवारीचा खेळ

sakal_logo
By
केवल जीवनतारे ः सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एकाच वैद्यकीय शिक्षकाला राज्याच्या विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात "पेश' करण्याचा कारनामा राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधनकडून वर्षांनुवर्षे सुरू आहे. गोंदिया येथील एमबीबीएसची मान्यता वाचवण्यासाठी नागपूरच्या मेडिकलमधून १८ तर मेयोतून २ डॉक्‍टरांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या उसणवारीवरील बदलीच्या या खेळात मेडिकलमध्ये वाढलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांवर टागंती तलवार आली आहे.

गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येत्या काही दिवसात भारतीय आर्युविज्ञान परिषदेचे निरीक्षण आहे. यामुळे गोंदिया मेडिकल कॉलेजमधील त्रृटी लपवण्यासाठी रात्रभरातुन बदलीचे प्रकार राज्याचा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग राबवतो. विशेष असे की, या धोरणामुळे मेडिकलमधील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांच्यात प्रचंड असंतोष आहे. मेयोमध्ये हाच उसणवारीचा खेळ नेहमीच सुरु असायचा, त्यावेळी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने थेट निर्णय देत पदभरतीचे आदेश देऊन यावर कायमचा तोडगा काढला होता, परंतु पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागाने हा खेळ सुरू केला आहे.

हेही वाचा: CM बघेल एअरपोर्टवर बसले धरणे देत; प्रियांकांच्या भेटीसाठी जाताना अडवलं

केवळ मेडिकलमधून २० वैद्यकीय शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश धडकले आहेत. एकाचवेळी मेडिकलमधील १८ डॉक्‍टरांची बदली झाल्यामुळे रुग्णसेवेवर याचा विपरित परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे. आर्युविज्ञान परिषदेच्या निकषांत एकदा एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षकाची नोंद झाली तर दुसऱ्या शासकीय महाविद्यालयात त्यांना ग्राह्य धरण्यात येत नाही. यामुळे गतवर्षी मेडिकलमध्ये वाढलेल्या एमडीच्या जागा येत्या एप्रिलमध्ये होणाऱ्या निरीक्षणानंतर कपात होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

loading image
go to top