Nagpur News: प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या विशेष मोहिमेतून महिलांना मिळाले नवे जीवन; १७ राज्यांतील १८० महिलांना मिळवून दिले कुटुंब

Nagpur Mental Hospital: नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील उपचारांमुळे विविध राज्यातील १८० मनोरुग्ण महिलांना अनेक वर्षांनंतर पुन्हा कुटुंब मिळाले. सामाजिक अधीक्षकांच्या विशेष मोहिमेतून या महिलांचा शोध घेऊन त्यांना घरवापसीसाठी मदत करण्यात आली.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

केवल जीवनतारे

नागपूर : मृत समजून घरच्यांनी पिंडदान, श्राद्ध आणि फोटोला हार घातले. मात्र, त्या जिवंत होत्या. विविध राज्यांतील अशा महिलांच्या आयुष्यात प्रादेशिक मनोरुग्णालयातील उपचारांनी नवे वळण दिले. मानसिक आरोग्य सुधारलेल्या महिलांचा शोध सामाजिक अधीक्षकांच्या विशेष मोहिमेतून घेण्यात आला. तब्बल १८० महिलांना अनेक वर्षांनंतर कुटुंब पुन्हा मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com