

Bee Attack
sakal
नागपूर : ग्रामीण भागात मधमाशांचे हल्ले नवीन नाहीत, परंतु प्रथमच उपराजधानीतील मानकापूर परिसरातील प्रादेशिक मानसिक रुग्णालयात गुरुवारी अचानक मधमाशांनी रुग्णांवर हल्ला केला. यात ६० वर्षीय मनोरुग्णाचा मृत्यू झाला, तर ३८ मनोरुग्ण आणि दोन कर्मचारी जखमी झाले. या घटनेमुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.