esakal | Nagpur Metro : विनापिलरने मेट्रोने उभारला पूल
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Metro : विनापिलरने मेट्रोने उभारला पूल

Nagpur Metro : विनापिलरने मेट्रोने उभारला पूल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सीताबर्डी ते प्रजापतीनगर या सुमारे शंभर मीटरच्या अंतरादरम्यान रेल्वे क्रॉसिंग असल्याने मेट्रोला पुढे जाण्यापासून मोठा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे बॅलन्स कँटलीवर पद्धतीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तो यशस्वी झाला आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

समुद्र तसेच मोठ्या मोठ्या दऱ्यांखोऱ्यांमध्ये पूल उभारताना याच पद्धतीचा वापर करण्यात येतो. आनंद टॉकिज जवळील रेल्वेने मार्गादरम्यान पिलर उभे करण्यास रेल्वेने करण्यास मनाई केली होती. त्यामुळे वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा विचार करण्यात आला. ‘बॅलन्स कँटीलीवर ब्रिज’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पुलांना कँटीलिव्हर कंस्ट्रक्शन ब्रिज (सीएलसी) असे म्हटले जाते. १०० मीटरच्या स्पॅनसाठी कँटीलिव्हची लांबी २३१ मीटर ठेवण्यात आली. रेल्वेसेवा विस्कळित होऊ नये यासाठी रात्रीच्या वेळी हे काम करण्यात आले. मे २०१९ मध्ये या कामाला सुरवात केली होती. आता पूल सज्ज झाला असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.

बचतीतून नवे स्थानक

८ हजार ६८० कोटी रुपयांचा मेट्रो प्रकल्प साकारला जात आहे. यातून उरलेल्या पैशात कॉटन मार्केट आणि एअरपोर्ट साउथ ही स्थानके साकारण्यात आली आहेत. मेट्रोच्या मूळ प्रकल्प अहवालात याचा उल्लेख नव्हता. झिरो माईल येथील कामही याच खर्चातून होणार आहे. १० टक्के बचतीतून ही कामे करण्यात येत असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.

पाणी साचणार नाही

मनीषनगर अंडरपास खोलगट भाग असल्याने तिथे पाणी साचते. पाणी साचू नये यासाठी पंपींगची व्यवस्था करण्यात आली असून यापुढे पाणी साचणार नसल्याचे दीक्षित म्हणाले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • पुलाची लांबी २३१.२ मीटर असून यात ३ स्पॅन आहेत.

  • हा पूल जमिनीपासून २२ मीटर उंचीवर आहे.

  • सुमारे ४ महिन्यात पुलाचे काम पूर्ण झाले.

loading image
go to top