Nagpur Midnight Violence
esakal
नागपूर, ता. ३ : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहाच्या इमारतीत असलेल्या एफ एस झोन कॅफेसमोर मध्यरात्री झालेल्या वादातून एक गटाने मालकाला मारहाण करीत त्याच्या कॅफेमध्ये आग लावून ते जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी ताजबाग येथील बुलंद गेटसमोर असलेली कारही जाळली. दरम्यान या घटनेने परिवारात तणाव निर्माण झाला होता.