

नागपूरमध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या ऑनलाइन मित्राने बेदम मारहाण, चाकूने घाव आणि लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील १९ वर्षीय आरोपीने मुलीला दिघोरी येथील रूमवर नेऊन सुमारे २० तास बंदिस्त ठेवले होते. हुडकेश्वर पोलिसांनी तिची सिनेस्टाईल सुटका केली.