Atharva Nannore Case Nagpur
esakal
नागपूर : हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतून बेपत्ता झालेल्या अथर्व नन्नोरे या १४ वर्षीय मुलाच्या हत्येची घटना पुढे येताच समाजमन सुन्न झाले आहे. शवविच्छेदनानंतर रविवारी दुपारी अथर्वचा मृतदेह घरी पोहोचताच आई-वडिलांसह नातेवाईकांनी टाहो (Nagpur Missing Boy case) फोडला. देवा तू असे का केले, असा एकच प्रश्न आई करीत होती. तिच्या डोळ्यातील अश्रूंचा महापूर पाहून उपस्थितांनाही हुंदके आवरणे कठीण झाले होते.