Nagpur : मोबाईल गेम खेळण्यात नागपूर राज्यात दुसऱ्या स्थानावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 mobile games

Nagpur : मोबाईल गेम खेळण्यात नागपूर राज्यात दुसऱ्या स्थानावर

नागपूर : मोबाईल गेमिंगची सध्या भलतीच क्रेझ आहे. अँग्री बर्डपासून तर पबजीसारख्या अनेक गेम्सनी तरुणांसह साऱ्यांनाच वेड लावले आहे. विशेष म्हणजे मोबाईल गेम खेळण्यात नागपूर राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. ‘इंडिया मोबाईल गेमिंग २०२२’ चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यात पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे. तर महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर आहे.

देशातील प्रत्येक तिसरा व्यक्ती ‘स्मार्ट फोन’ वापरतो. स्मार्ट फोनच्या खिशाला परवडणाऱ्या किमती, स्वस्त डेटा आणि सुधारित बँडविड्थच्या उपलब्धतेमुळे गेमर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

या अहवालानुसार, नागपुरातील ६२ टक्के स्मार्ट फोन युजर्स मोबाईलवर गेम खेळतात. सध्या नवनवीन स्मार्टफोन आणि त्यात वेळोवेळी उपयोगी पडणाऱ्या विविध अप्लिकेशन्सची चलती आहे. देशात वायरलेस कनेक्टिव्हिटी वाढल्याने हा बदल दिसून येतो. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढत असल्याने मोबाईल गेमिंग मार्केटमध्ये ॲडव्हान्स गेमची नव्याने भर पडत आहे हे विशेष.

गेम्स खेळणाऱ्यांचे काही आश्चर्यकारक पैलू

-८५ टक्के लोक गेम खेळणे स्वतःचा छंद असल्याचे मान्य करीत नाही

-सरासरी २५ टक्के महिला गेम्समध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त काळ टिकून राहतात

-४३ टक्क्यांपेक्षा अधिक महिला आठवड्यात पाचपेक्षा जास्त वेळा गेम्स खेळतात

-स्मार्ट फोन वापरणारे स्वतःचा ९० टक्के वेळ गेम्स आणि अप्लिकेशनवर खर्च करतात

-प्रत्येक जण महिन्यात विविध प्रकारचे किमान दोन ते तीन गेम्स खेळतात

-५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक मोबाईल गेम बाथरूममध्ये असताना खेळतात

देशातील पहिले पाच राज्य

प्रथम - उत्तर प्रदेश

दुसरे - महाराष्ट्र

तिसरे - राजस्थान

चौथे - बिहार

पाचवे - पश्चिम बंगाल

महाराष्ट्रातील शहरे

प्रथम - मुंबई

दुसरे - नागपूर

तिसरे - पुणे

चौथे - ठाणे

पाचवे - नाशिक

सध्या ऑनलाइन गेमिंगचे प्रमाण वाढत आहे. त्यात ऑनलाइन जुगाराचा समावेश आहे. लोकांना याची सवय लागत आहे. देशात सायबर थ्रेटचे प्रमाण वाढले आहे. अनेकांचा पर्सनल डेटा सहज चोरला होत असून, सायबर क्राईम वाढत आहेत.

अमोल रंगारी, सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट

मोबाईल गेम्स अट्रॅक्टिव्ह असल्याने त्याचे कधी व्यसनात रूपांतर होईल सांगता येत नाही. यामुळे भावनिक आणि व्यावहारिक दुष्परिणाम जाणवू शकतात. सध्या मोबाईलच्या व्यसनामुळे नोमोफोबिया नावाच्या आजाराचे प्रमाणात वाढत आहे.

डॉ. आशिष कुथे, मानसोपचारतज्ज्ञ, नागपूर

सर्वाधिक खेळले जाणारे गेम

लुडो डाइस, स्नेक्स अँड लॅडर्स (सापशिडी), कॅरम, फ्रूट डार्ट, ब्लॉक पझल आणि पोकर

ऑनलाइन

गेमिंगचे धोके

निद्रानाशाची समस्या

कामात लक्ष न लागणे

सायबर क्राईमच्या शक्यतेत वाढ

कॅन्सर, डिप्रेशन सारख्या आजारात वाढ

का आहे गेम खेळण्याचा नाद?

तणाव दूर करणे

एका आभासी दुनियेचा आनंद मिळविणे

काही आव्हानात्मक केल्याचे समाधान

स्वतःबाबत काहीतरी वेगळे केल्याचा आनंद

अनोख्या विषयाशी जुळणे