Lightning Strike: नागपूर शहरातील धुव्वाधार पावसात भांडेवाडी परिसरातील दुकान जळून खाक झाले आणि इतवारी परिसरातील जुने घर कोसळले. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणताही जीवितहानी झाली नाही.
नागपूर : शनिवारी शहरातील विविध भागामध्ये झालेल्या धुव्वाधार पावसाने चांगलाच हाहाकार माजविला. विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसात भांडेवाजी परिसरातील एका दुकानावर वीज कोसळून संपूर्ण दुकान खाक झाले.