तीनचा आकडा काँग्रेससाठी शुभ? २००२च्या पुनरावृत्तीची आशा

congress
congresssakal

नागपूर : तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा महाविकासआघाडीचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडला नसला तरी तीनच्या प्रभागामुळेच नागपूर महापालिकेत काँग्रेसला सुवर्णकाळ अनुभवला आहे. विकास ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांचा येथूनच उदय झाला. २००२च्या निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होईल अशी आशा आता बाळगली जात आहे.

नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असताना तत्कालीन राज्यातील काँग्रेस सरकारने २००२च्या महापालिका निवडणुकासाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब केला होता. त्याचा लाभ काँग्रेसला झाला. शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांचा याच निवडणुकीतून उदय झाला. प्रथमच निवडून आलेले विकास ठाकरे थेट महापौरांच्या खुर्चीत विराजमान झाले होते.

congress
‘तुझ्या पतीचा अपघात झाला, माझ्यासोबत लवकर चल’ अन्...

भाजपच्या पराभवाला गाजलेला क्रीडा साहित्य घोटाळा आणि तत्कालीन महापालिका आयुक्त टी. चंद्रशेखर यांची प्राशसकीय राजवट हीसुद्धा कारणीभूत ठरली होती. त्यानंतर तीन निवडणुका पार पडल्या. एक, दोन आणि चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्यात आली. तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा तीनचा प्रभाग झाला आहे. राज्यात काँग्रेस तर मनपात भाजप सत्तेवर आहे.

सेना-राष्ट्रवादीची तडजोड

तीन पक्षांच्या राज्यातील महाविकासआघाडी सरकारने महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेऊन सर्वांनाच धक्का दिला. एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी ही राजकीय तडजोड असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महिनाभरापासून प्रभाग किती सदस्यांचा होणार याकडे महापालिका निवडणूक लढणाऱ्या सर्व इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. प्रभाग एक सदस्यांचाच व्हावा अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा होती. राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यामुळे प्रभाग एकचाच राहील यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच सुखावले होते.

congress
किती हे प्रेम! चक्क कोंबड्याचा वाढदिवस केला साजरा

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या इच्छेला फारसे स्थान नाही

मागील महापालिकेच्या निवडणुकीच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घात झाल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे एकचाच प्रभाग करावा यासाठी कार्यकर्ते आग्रही होते. अनेकांनी विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात देखील केली होती. मात्र, तीन पक्षाचे सरकार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या इच्छेला फारसे स्थान मिळाले नसल्याचे दिसून येते.

हात घट्ट पकडून ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही

चार दिवसांपूर्वी एकचा नाही झाला तरी दोन सदस्यीय प्रभाग पद्धती राहील असे काँग्रेसच्या नेत्यांचे ठाम म्हणणे होते. मुंबई वगळता शिवसेना आणि पुणे महापालिका वगळता राष्ट्रवादीला एक सदस्यीय पद्धत राजकीयदृष्ट्या नुकसानीची आहे. विदर्भात काँग्रेसचा हात घट्ट पकडून ठेवण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा अंदाज आल्याने बहुसदस्यीय प्रभाग पद्धती त्यांच्यासाठी आवश्यक होती, असा तर्क लावला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com