
Nagpur Election : नागपूर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; पाहा वॉर्ड रचना
नागपूर : राज्यातील ९ महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यांपैकी नागपूर महापालिकेच्या आरक्षणामुळं अनेक प्रभाग रचना आणि वॉर्ड रचनेत बदल झाल्यानं अनेकांची अडचण झाली आहे. नागपूर महापालिकेत ५२ प्रभागांतील महिलांच्या अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुरेश भट सभागृहात आरक्षणाची सोडत काढली. यंदा चार ऐवजी तीन वॉर्डचा प्रभाग झाल्यानं ही संख्या ३८ वरुन ५२वर पोहचली आहे. तर वॉर्ड १५१ वरुन १५६ झाले आहेत. (Nagpur Municiapal Election 2022 reservation announces See ward structure)
हेही वाचा: अहिल्याबाई होळकरांचं कार्य रोहित पवार पुढे नेत आहेत - शरद पवार
सन २०११च्या लोकसंख्येनुसार प्रभागांमधील अनुसूचित जाती, जमातींची संख्येच्या आधारावर आरक्षण काढण्यात आलं यामध्ये महिलांसाठी ५० टक्के वॉर्ड आरक्षित आहेत. या सोडतीत तीन सदस्यीय प्रभागात १६ प्रभागात प्रत्येकी एक जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित निघाली. तर सहा जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले.
हेही वाचा: वाद हनुमान जन्मस्थळाचा; पण साधूचं भिडले, नाशकात 'खुर्ची'वरून वादंग
दरम्यान, ५६ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. या आरक्षण सोडतीत काहींना दिलासा मिळाला असला तरी मागील पाच वर्षे सत्तेत असलेले भाजपमधील माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या २३ क्रमांकाच्या प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गात दोन महिला व एक पुरुष असे आरक्षण निघाले आहे. जुन्या चार सदस्यीय प्रभागात माजी नगरसेवक ॲड. संजय बालपांडे व दयाशंकर तिवारी निवडून आले होते. आता एकच पुरुष आरक्षण असल्याने माजी महापौर तिवारी किंवा ॲड. बालपांडे यांना स्वतःचा प्रभाग सोडून इतरत्र लढावे लागणार आहे. या दोघांत कोण हा प्रभाग सोडतो, याबाबत त्यामुळं उत्सुकता निर्माण झाली आहे.
असं असेल आरक्षण?
अनुसुचित जाती (महिला) -
या प्रवर्गात १६ जागांसाठी सोडत काढण्यात आली आहे.
प्रभाग क्र 2 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र. 10 मधील जागा क्र. क
प्रभाग क्र. 43 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र. 13 मधील जागा क्र. अ,
प्रभाग क्र, 20 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र. 30 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र 27 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र 39 मधील जागा क्र. -
प्रभाग क्र. 16 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र. 37 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र. 45 मधील जाग क्र. अ
प्रभाग क्र. 1 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र. 14 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र. 38 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र. 15 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र. 52 मधील जाग क्र. अ
अनुसुचित जमाती (महिला) -
या प्रवर्गात ६ जागांसाठी सोडत काढण्यात आली आहे.
प्रभाग क्र 24 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र. 11 मधील जागा क्र. अ
प्रभाग क्र. 37 मधील जागा क्र. ब
प्रभाग क्र. 12 मधील जागा क्र. ब
प्रभाग क्र. 4 मधील जागा क्र. ब
प्रभाग क्र. 51 मधील जाग क्र. ब
सर्वसाधारण गट (महिला) -
प्रभाग 31मधून जागा क्र. ब
प्रभाग 22 मधून जागा क्र. ब
प्रभाग 23 मधून जागा क्र. ब
प्रभाग 40 मधून जागा क्र. ब
प्रभाग 32 मधून जागा क्र. ब
प्रभाग 49 मधून जागा क्र. ब
प्रभाग 29 मधून जाग क्र. ब
प्रभाग 35 मधून जागा क्र. ब
प्रभाग 17 मधून जागा क्र. ब
प्रभाग 17 मधून जागा क्र. ब
प्रभाग 48 मधून जाग क्र. ब
प्रभाग 6 मधून जागा क्र. ब
प्रभाग 2 मधून जागा क्र. ब
Web Title: Nagpur Municiapal Election 2022 Reservation Announces See Ward Structure
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..