Nagpur : नवरा असावा तर अस्सा...यंत्रणाच लावली कामाला

मनपा प्रयोगशाळा सहाय्यकाचा अफलातून प्रयोग
Nagpur Municipal corporation Election
Nagpur Municipal corporation Electionsakal

नागपूर : महापालिकेतील प्रयोगशाळा सहाय्यकाने बायकोच्या मानधनवाढीसाठी केलेल्या शिफारशीमुळे येथील कंत्राटीपद्धतीने कार्यरत असलेल्या तब्बल ५४ शिक्षकांच्या मानधनात भरघोस वाढ झाली आहे. त्यामुळे नवरा असावा तर अस्सा, अशी चर्चा महापालिकेत रंगली आहे.

नागपूर महापालिकेच्या शिक्षण विभागात असे अनेक अफलातून प्रयोग नेहमीच होत असतात. कधी सत्ताधारी तर कधी अधिकाऱ्यांचा अशा प्रयोगाला आशीर्वाद लाभतो. कर्मचाऱ्यांच्या भल्यात सर्वांचेच भले होत असल्याने कोणी काही बोलत नाही एवढेच.

मनपाच्या एका शाळेत असा अफलातून व्यक्तिमत्त्व लाभलेला सहाय्यक प्रयोगशाळा कर्मचारी कार्यरत आहे. तो सुमारे १८ वर्षांपासून शाळेत कधीच गेला नाही तर मनपाच्या मुख्यालयात असलेल्या शिक्षण विभागातच तो दिसतो. कधी तो स्वतःला भांडार लिपिक तर शिक्षण विभागाचा समन्वयक असल्याचे सांगतो. तसे अधिकृत पत्रही काढतो.

Nagpur Municipal corporation Election
Nagpur : कानपुरी हातांनी वाढणार शीरखुर्म्याची लज्जत

समन्वयक हे पदच शिक्षण विभागात नाही, हे येथे उल्लेखनीय. या तथाकथित समन्वयकाची पत्नी महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. समन्वयकाच्या हुद्द्याने या महाभागाने कंत्राटी शिक्षकांना फारच कमी मानधन असल्याने वेतनवाढीची शिफारस केली होती.

Nagpur Municipal corporation Election
Nagpur : ‘संविधान पार्क’चा तरी आदर ठेवा हो!

याकरिता नवी मुंबईतील महापालिकेत कार्यरत कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाचा दाखल देण्यात आला. शिफारस करणारा अफलातून असल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. कोणी नियमावली, महापालिकेच्या आर्थिक स्थिती बघण्याच्या भानगडीत पडले नाही. अतिरिक्त आयुक्तांनी झटपट फाईल पुटअप केली आणि महापालिका आयुक्तांनी त्यास तत्काळ मंजुरी देऊन `निर्णय वेगवान, गतिमान प्रशासन'' या राज्य सरकारच्या धोरणाची प्रचिती दिली. एवढेच नव्हे तर अकरा महिन्यांचे कंत्राट असताना महिन्याला एक यानुसार शिक्षकांना १२ किरकोळ रजाही देण्याचा निर्णय घेतला.

महापालिकेच्या शिक्षण विभागात समन्वयक हे पद नाही हे खरे आहे. संबंधित विषयावर मी थोड्यावेळाने बोलतो.

राजेंद्र पुसेकर,शिक्षणाधिकारी मनपा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com