नागपूर : दुकानदाराने हसत हसत भरला दंड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur municipal corporation action against plastic bags

नागपूर : दुकानदाराने हसत हसत भरला दंड!

नागपूर - महापालिकेने प्लास्टिकविरोधी मोहिम तीव्र केली असून उपद्रव शोध पथकाकडून दररोज दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान अनेकदा दुकानदारांकडून कारवाईचा विरोध करीत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. परंतु जागनाथ बुधवारी रोडवरील एका दुकानदाराने आनंदाने दंडाची पावती घेतली अन् ५ हजार रुपये दिले.

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांवर शनिवारीही कारवाई केली. अनेक ठिकाणी उपद्रव शोध पथकाला दुकानदारांकडून विरोध केला गेला. काही दुकानदारांनी प्लास्टिक पिशव्या लपविण्याचाही प्रकार केला. परंतु जागनाथ बुधवारी येथील एसएसडी कलेक्शनचे संचालक संजय शवलानी यांनी हसत हसत दंडाची पावती घेतली. दंडाची पावती स्वीकारताना त्यांचे हास्यही उपद्रव शोध पथकाने कॅमेऱ्यात बंद केले. त्यांच्याकडून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

पथकाची कारवाई

  • ७५ हजारांचा दंड

  • ४० किलो प्लास्टिक जप्त

`दंड` झालेली प्रतिष्ठाने

उपद्रव शोध पथकाने शनिवारी लक्ष्मीनगरातील पूर्स प्लस प्लेट्‍स, बेलतरोडीतील मां साडी सेंटर, मेडिकल चौकातील रेस्टॉरंट, हसनबाग चौकातील एचबीटी बेकर्स ॲऩ्ड केक्स, नंगा पुतळा येथील संगीता साडी, भारता माता चौकातील पार्थ ट्रेडिंग, चिखली ले-आऊट येथील अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट, छावनी येथील पूनम चेंबरमधील मोंटो कार्लो, जरीपटका येथील जिंजर मॉलमधील अनवेल्स द सरप्राईज, जरीपटका येथील कार्तिक ट्रेडर्स, शीज वर्ल्ड या प्रतिष्ठानांवर प्रति पाच हजार रुपये दंड ठोठावला. आवळे बाबू चौकातील नवनिर्माण बिल्डर्सवर बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवल्याबाबत दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

Web Title: Nagpur Municipal Corporation Action Against Plastic Bags Plastic Ban Fine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..