Nagpur : कोट्यवधी खर्चूनही रखडला विकास; संथवृत्तीचा ९०० कोटींच्या कामांना फटका

विशेष म्हणजे सिमेंट रस्ता टप्पा एकची कामे २०१८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.
Nagpur municipality
Nagpur municipalitysakal

नागपूर : शहरात मागील वर्षी किंवा त्यापूर्वीही सुरू झालेल्या विकास कामांना महापालिकेच्या संथगतीचा फटका बसल्याचे चित्र आहे. जवळपास ९०४ कोटींची कामे खितपत पडली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने ही कामे सुरू करण्यासाठी शंभरावर कोटी खर्च केले. परंतु कामे रखडली आहेत. दरवर्षी प्रकल्पांची किंमत वाढत असल्याने कंत्राटदारांचे मात्र चांगलेच फावत आहे.

मागील वर्षी महापालिकेने शहरातील सक्करदरा, सोनेगाव, गांधीसागर, नाईक तलाव, लेंडी तलावाची कामे सुरू केली. या तलावांच्या सौंदर्यीकरणावर एकूण १२५ कोटी ३० लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. या तलावाच्या कामांची किंमत वाढली आहे. या तिन्ही तलावाच्या कामाची मूळ किंमत ५८ कोटी ३२ लाख होती. या प्रकल्पांवर आतापर्यंत एकूण ३५ कोटी रुपये खर्च झाले. परंतु अजूनही सौंदर्यीकरण पूर्ण झाले नसून तलावाची दुर्दशा दिसून येत आहे. याशिवाय १३ कोटींच्या नाईक तलावाच्या कामांवर दीड कोटी खर्च करण्यात आले.

संथगतीचा ९०० कोटींच्या कामांना फटका

१४ कोटींच्या लेंडी तलावाच्या कामावर केवळ १ कोटी खर्च झाले. तलावच नव्हे जुना भंडारा रोड तसेच रामजी पहलवान रोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया मागील वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत ३७ कोटी खर्च झाले. पण भूसंपादनाचा प्रश्न अद्यापही मिटला नसल्याने दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण रखडले आहे.

याशिवाय साडेआठ कोटींचा नाग नदीवरील पूल, दीड कोटीचे सुरेंद्रगढ शाळेचे काम, ५१ कोटी ५५ लाखांची पंतप्रधान आवास योजना, ५१ कोटी ५१ लाखांचे ऑरेंज सिटी स्ट्रिट वाणिज्य संकुल, १४ कोटींचे मिनीमातानगर येथील आरोग्य केंद्राचे काम मागील वर्षी सुरू झाले. परंतु कोणतीही कामे अद्याप कामे पूर्ण झालेली नाही.

विशेष म्हणजे सिमेंट रस्ता टप्पा एकची कामे २०१८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण ९.६२ कोटींची कामे शिल्लक आहेत. याशिवाय सिमेंट रस्ता टप्पा तीनमधील १७ रस्त्यांची कामे झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामे अर्धवट असल्याने नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

इतर रखडलेले प्रकल्प

विद्यापीठ ग्रंथालयाजवळ नाग नदीवरील पूल ः ८.३८ कोटी

सुरेंद्रगढ शाळेचे बांधकाम ः १.६१ कोटी

पीएमएवाय अंतर्गत ४८० गाळे ः ५१.५५ कोटी

ऑरेंज सिटी स्ट्रीट वाणिज्य संकुल ः ५१.५१ कोटी

मिनीमातानगर यूपीएचसी बांधकाम ः १४ कोटी (पाच कोटी खर्च)

भूसंपादनाची प्रक्रिया रखडली

जुना भंडारा रोड ः प्रकल्प किंमत ३३० कोटी, खर्च २५ कोटी

रामजी पहलवान रोड ः खर्च १२ कोटी

रखडलेले सिमेंट रस्ते

सिमेंट रस्ते पहिला टप्पा ः प्रकल्पाची किंमत - १०४ कोटी, शिल्लक कामांची किंमत - ९ कोटी ६२ लाख

सिमेंट रस्ते तिसरा टप्पा ः प्रकल्पाची किंमत - ३०० कोटी, शिल्लक रस्ते - १७

सुरेंद्रगढ शाळेसाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला. त्यानंतर कामे सुरू झाली. ही कामे वेळेत व दर्जेदार व्हावी ही अपेक्षा आहे. तलाव सौंदर्यीकरणाचे प्रस्ताव तर अनेकदा बदलले. महापालिकेने या कामांना गती दिल्यास तलावांच्या बाबतीत नागपूर शहर भोपाळपेक्षाही सुंदर होऊ शकते.

- अभिजित झा, नागपूर सिटीझन फोरम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com