
नागपूर महापालिका सार्वत्रिक निवडणुक : ओबीसींसाठी ३५ जागा
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागातील ओबीसींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. ओबीसींसाठी एकूण ३५ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यापैकी १८ जागा महिलांसाठी राखीव असतील. सर्वसाधारण गटात महिलांसाठी ३८ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. आज काढण्यात आलेल्या आरक्षणामुळे काहीजण थोडक्यात बचावले तर माजी महापौरांना फटका बसला.
महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आज महाल येथील नगरभवनात ओबीसींसाठी काही प्रभागात थेट तर काही प्रभागांसाठी सोडती काढत आरक्षण निश्चित करण्यात आले. महिलांच्या ५० टक्के आरक्षणानुसार ओबीसींसाठी जागा निश्चित करण्यात आल्या. ३१ मे रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जातीसाठी ३१ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. यात महिलांसाठी १६ जागा राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी १२ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. यात सहा जागा महिलांसाठी राखीव आहेत. हे आरक्षण कायम ठेवत सर्वसाधारण गटातील जागांमधून ओबीसींचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
ओबीसींसाठी एकूण ३५ जागा आरक्षित केल्या. यातील १८ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. निवडणूक अधिकारी महेश धामेचा यांनी १८ पैकी नऊ जागा थेट आरक्षित केल्या तर ९ जागा ईश्वर चिठ्ठीने आरक्षित केल्याचे सांगितले. सर्वसाधारण गटात महिलांसाठी ३८ जागा आरक्षित आहेत.
विविध गट, महिलांसाठी आरक्षित जागा
३५ (महिला १८) ओबीसी गट
७८ (महिला ३८) सर्वसाधारण गट
३१ (महिला १६) अनुसूचित जातीसाठी एकूण जागा
१२ (महिला ०६) अनुसूचित जमातीसाठी एकूण जागा
ओबीसींसाठी आरक्षित प्रभाग
ओबीसी महिला : ३ अ, ६ अ, ८ ब, ९ ब, १७ ब, १९ ब, २१ ब, २५ ब, २६ अ, २९ अ, ३१ अ, ३३ ब, ३४ ब, ४४ ब, ४६ ब, ४८ अ, ४९ अ, ५० अ.
ओबीसी खुला गट : २ ब, ११ ब, १५ ब, २२ अ, २३ अ, २४ ब, ३२ अ, ३५ अ, ३८ ब, ३९ ब, ४० अ, ४१ अ, ४२ अ, ४३ ब, ४५ ब, ४७ अ, ५२ ब.
सर्वसाधारण गटात महिलांसाठी आरक्षित
सर्वसाधारण महिला : १ ब, २ क, ३ ब, ५ ब, ६ ब, ७ ब, ८ क, ११ क, १२ क, १४ ब, १७ ब, १८ ब, २० क, २२ ब, २३ ब, २४ क, २५ क २६ ब, २७ ब, २८ ब, २९ ब, ३० ब, ३१ ब, ३२ ब, ३३ क, ३४ क, ३५ ब, ३६ ब, ४० ब, ४१ ब, ४२ ब, ४३ क, ४७ ब, ४८ ब, ४९ ब, ५० ब, ५१ क, ५२ क.
सर्वसाधारण खुला गट : १ क, ३ क, ४ क, ५ क, ६ क, ७ क, ९ क, १० क, १३ क, १४ क, १५ क, १६ क, १७ क, १८ क, १९ क, २१ क, २२ क, २३ क, २६ क, २७ क, २८ क, २९ क, ३० क, ३१ क, ३२ क, ३५ क, ३६ क, ३७ क, ३८ क, ३९ क, ४० क, ४१ क, ४२ क, ४४ क, ४५ क, ४६ क, ४७ क, ४८ क, ४९ क, ५० क.
Web Title: Nagpur Municipal Corporation Election 35 Seats For Obc Reservation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..