ऑरेंज सिटीमध्ये वाढले राष्ट्रवादी-शिवसेनेचे भाव

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत आघाडीसाठी काँग्रेसवर दबाव
Nagpur Municipal Corporation election NCP Shiv Sena Congress
Nagpur Municipal Corporation election NCP Shiv Sena Congress

नागपूर : पाच राज्यांमध्ये काँग्रेस पराभूत झाल्याने नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपले भाव वाढवले आहे. महाविकास आघाडी करून आमच्यासाठी प्रत्येकी २५ जागा सोडाव्यात अशी मागणी आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून केली जात आहे.

नागपूर शहरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे काँग्रेस नेते त्यांच्यासोबत महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्यास इच्छुक नाही. तसे संकेतही स्थानिक नेत्यांनी यापूर्वी दिले आहे.

राष्ट्रवादीचा एक तर शिवसेनेचे दोनच नगरसेवक शहरात आहेत. त्यामुळे स्वबळावर लढावे निकालानंतर आघाडी करावी असा फॉर्म्युला काँग्रेसने दिला आहे. मात्र महाविकास आघाडीवर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. पाच राज्यातील निवडणुकीने काँग्रेस कमजोर झाली असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे समविचारी तसेच महाविकास आघाडीतील पक्षांना सोबत घेणे किती गरजेचे आहे याकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे स्थानिक नेते लक्ष वेधले.

पंधरा वर्षांपासून काँग्रेस महापालिकेच्या सत्तेबाहेर आहे. आघाडीतील तीनही पक्ष एकत्रित लढल्यास भाजपचा सामना करता येईल. भाजपला पराभूतसुद्धा करता येईल. त्यासाठी काँग्रेसला हट्ट सोडावा लागेल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही काही पॉकेट्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com