Nagpur Election Results 2026
esakal
गुरुवारी नागपूर महानगरपालिकेसाठी मतदान पार पडलं होतं. त्याचा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यानुसार नागपूरमध्ये भाजपचं वर्चस्व पुन्हा एखदा सिद्ध झालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपाने ११० जागांवर आघाडी मिळवली आहे, तर काँग्रेसला ३० जागा मिळाल्या आहेत. याशिवाय शिंदे गटाला २ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागेवर आघाडीवर आहे. तसेच ६ अपक्ष उमेदवार देखील आघाडीवर हाच कल काय राहिल्यास भाजपा पुन्हा सरकार बनवेल हे निश्चित आहे. महत्त्वाचे म्हणजे यापैकी काही उमेदवारांचा विजय देखील झाला आहे. त्यांची यादी आता समोर आली आहे.