esakal | कोरोनाबाधितांचा कधी घरी, तर कधी अ‌ॅम्बुलन्समध्येच मृत्यू; महापालिका फक्त शव उचलण्याच्या कामाची
sakal

बोलून बातमी शोधा

file image

कोरोनाबाधितांचा कधी घरी, तर कधी अ‌‌ॅम्बुलन्समध्येच मृत्यू; महापालिका फक्त शव उचलण्याच्या कामाची

sakal_logo
By
केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत बेचाळीस हजारांवर कोरोनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यांना आरोग्य सुविधा पोहोचविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, महापालिकेने साऱ्या कोरोनाबाधितांना वाऱ्यावर सोडले आहे. खाटा उपलब्ध करून देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. यामुळे घरातच किंवा अ‌ॅम्बुलन्समधून स्ट्रेचरवर घेताच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याचे वास्तव पुढे आले आहे. केवळ कर्तव्यात कसूर करण्यात येत असल्यानेच उपराजधानीत या भयावह वास्तवाला सामोरे जावे लागत आहे. उघड्या डोळ्यांनी कोरोनाबाधितांचे मृत्यू महापालिकेचे अधिकारी बघत आहेत. परंतु, यंत्रणेत सुधारणा केली जात नाही. केवळ बाधितांचे शव उचलून घाटावर पोहोचवणे हीच तेवढी जबाबदारी महापालिकेचे कामगार पेलवत आहेत, या चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा - पर्यटकांनो! आजपासून ताडोबा 'या' दिवसापर्यंत राहणार बंद

उरुवेला कॉलनी नजीक कानफाडे नगर येथील सदाशिव मून (६५) यांचा घरीच मृत्यू झाला, तर नारायणराव नितनवरे (७३) यांना रुग्णालयात अ‌ॅम्बुलन्मधून काढून स्र्टेचरवर ठेवल्यानंतर लगेच मृत्यू झाला. या दोघांनाही खाट मिळाली नाही. सदाशिव मुन यांचे सारे कुटुंब कोरोनाबाधित आहे. एकमेकांच्या काळजीने यांचा जीव तुटत होता. सदाशिवराव यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत गेले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मेडिकलमध्ये नेले, परंतु खाट उपलब्ध झाली नाही. मेडिकलमधून घरी पाठवले. आयसोलेशन कोविड केअर सेंटरमध्ये गेल्यानंतर हातावर चारदोन औषधं ठेवली. घऱी जाण्यास सांगितले. घरीच असताना त्यांची प्रकृती खालावली. अखेर मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत नारायणराव नितनवरे (७३) यांना हिंगणा येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले. अ‌ॅम्बुलन्समध्ये बराच वेळ त्यांना ठेवले. यानंतर स्ट्रेचरवर सुमारे दीड तास कोणीही हात लावला नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाने त्यांचा बळी घेतला. विशेष असे की, नारायणराव राष्टीय पातळीवरील कबड्डीपटू होते. त्यांना त्यांच्यावर असा उपेक्षेचा सामना करण्याची वेळ अखेरच्या क्षणी आली.

हेही वाचा - धक्कादायक! नागपूरच्या शासकीय रुग्णालयात केवळ १०० रेमडिसिव्हिर शिल्लक; रुग्णांचा जीव टांगणीला

रात्रभर घरीच होते कोरोनाबाधिताचे शव -

सदाशिव मुन यांचा मृत्यू झाल्यानंतर शव उचलण्यासाठीही महापालिकेला कळविण्यात आले. मात्र, कोणीही आले नाही.रात्रभर शव घरीच पडून होते अशी तक्रार करण्यात आली. दुसऱ्या दिवशी बुधवारी महापालिकेकडून वाहन पाठवले असल्याची माहिती आहे. सदाशिवरावांसारख्या अनेकांचे उपचाराअभावी मृत्यू होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार आणि कोरोना संदर्भात प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल करणारे ठरले आहे.

हेही वाचा - तूरसह हरभरा डाळीच्या दरात वाढ, साखरही महागणार

सहा तास शव स्‍ट्रेचरवर -

नारायण नितनवरे यांचा रुग्णालयात स्ट्रेचरवर मृत्यू झाला. यानंतर त्यांचे शव रुग्णालय प्रशासनाने घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने महापालिकेला कळविले नाही. अखेर मृतकाच्या नातेवाइकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अडिच वाजता मृत्यू झाला. मात्र, रात्री साडेआठ वाजून गेल्यानंतरही महापालिकेची शववाहिका रुग्णालयात पोहोचली नसल्याची तक्रार करण्यात आली. अशाप्रकारे महापालिकेचा आरोग्य विभाग एका आजारी वृद्धाला रुग्णालयात बेड उपलब्ध करून देऊ शकत नाहीच. परंतु, मृत्यूनंतर साधी शववाहिकेची व्यवस्थाही सात तासानंतरही करू शकत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

हेही वाचा - पोलिसाच्या घराला आग लावणारे CCTVतील ते दोघे कोण? कुटुंबीयांनाही मारण्याचा केला प्रयत्न

loading image
go to top