
प्रवीण वानखेडे
नागपूर : शहरातील विविध भागात कुठे ना कुठे बांधकामे सुरू आहेत. कुठे उड्डाणपुलाचे बांधकाम तर, कुठे सिमेंट रस्ते बांधले जात आहेत. अनेक ठिकाणी मलवाहिन्या टाकण्याच्या कामाची भर त्यात पडली आहे. इमारतींची बांधकामेही होत आहेत. परिणामी शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाढत्या धुळीवर मनपाने आता मिस्टिंग टँकरची मलमपट्टी करण्याचे ठरविले आहे.