Nagpur : महापालिकेकडून अंगणातील गायी, बकऱ्यांसाठीही नोटीस!

रस्त्यांवर गिट्टी, मुरूम, विटा ठेवणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्टनुसार कारवाई केली जात आहे.
Animal
Animalsakal

नागपूर : अंगणात बांधलेली गाय, बकऱ्यांसाठीही महापालिकेकडून संबंधित नागरिकांना नोटीस देऊन कारवाईची धमकी दिली जात आहे. मुळात रस्त्यांवर गिट्टी, मुरूम, विटा ठेवणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्टनुसार कारवाई केली जात आहे. मात्र या कायद्याचा गैरवापर करीत गाय, बकरी आदी पाळणाऱ्यांवरही कारवाई केली जात असल्याने नागरिकांत संताप आहे. विशेष म्हणजे प्रभागातील सत्ताधारी नगरसेवकांच्या इशाऱ्यावर प्रशासन विरोधकांचे घर लक्ष्य करीत असल्याचाही आरोप होत आहे.

शहरातील अंतर्गत वस्त्यांमधील तसेच मुख्य रस्त्यावरील गिट्टी, विटा, रेती, मुरूम आदी ठेवणाऱ्यांविरोधात महापालिका कारवाई करीत आहे. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकांची अशा नागरिकांत भीती आहे. परंतु आता गाय, म्हशी, बकरी आदी पाळणाऱ्यांनाही उपद्रव शोध पथकाने लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. प्रभाग ३३ मध्ये उपद्रव शोध पथकाकडून बकऱ्या पाळणाऱ्यांनाही नोटीस दिली जात आहे.

या प्रभागात झोपडपट्टी परिसरात अनेक गरीब नागरिक बकऱ्या पाळून उदरनिर्वाह करीत आहेत. विशेष म्हणजे या बकऱ्या घरीच अंगणात बांधून ठेवलेल्या असते. या गरिबांच्या रोजगारावर आता उपद्रव शोध पथकाने लक्ष्य केंद्रित केले. परिसरातील नागरिकांच्या मते प्रभागातील सत्ताधारी नगरसेवकांच्या आदेशावरून ही कारवाई केली जात असल्याचे काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Animal
शेतकऱ्यांची आणखी एक मागणी मान्य, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा!

गेल्या अनेक वर्षांपासून बकऱ्या पाळत असताना आताच ही कारवाई का केली जात आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महापालिकेने दिलेल्या नोटीसमध्ये रेती, विटा, गिट्टी, मुरूम आदींवर कारवाईबाबत स्पष्ट लिहिले आहे. परंतु नगरसेवकांच्या आदेशावरून छापिल नोटीसवर बकरी, झोपडी बांधल्याचे हस्ताक्षरात लिहिण्यात येत आहे. हा मनपा कायद्याचा गैरवापर असल्याचेही काहींनी नमुद केले.

"महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून कायद्याचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. सामान्य जनतेला त्रास देण्याचा प्रकार निंदनीय आहे. अधिकाऱ्यांनी उपद्रव शोध पथकातील जवानांना महाराष्ट्र म्युन्सिपल ॲक्टबाबत माहिती देऊन कारवाईचे आदेश द्यावे, अन्यथा एखादे प्रकरण अंगावर शेकण्याची शक्यता आहे."

- ॲड. यशवंत मेश्राम, माजी नगरसेवक व निवासी प्रभाग ३३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com