अख्खं नागपूर डेंगी अन् मलेरियाला पोषक, मोकळ्या भूखंडांवर डबके

ramangar
ramangare sakal

नागपूर : शहरातील विविध भागांमध्ये सिवेज लाइनवरील चेंबर उघडी असून मोकळ्या भूखंडांवर झुडपे वाढली आहेत. एवढेच नव्हे अनेक भूखंडावरील डबकी डासनिर्मितींची केंद्र झाली असून अख्खे शहर मलेरिया, डेंगीसाठी (maleria and dengue) पोषक झाले आहे. घराघरांत मलेरियाच्या तापाने रुग्‍ण फणफणत आहेत. डेंगीवर नियंत्रणासाठी फॉगिंग मशिन व फवारणी करण्यासंबंधात प्रशासनानही केवळ औपचारिकता पार पाडत आहे. पदाधिकारी व नगरसेवकही डेंगीबाबत गंभीर नसल्याचे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. (nagpur municipal corporation not taken preventive measures for dengue and maleria)

ramangar
अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात

शहरातील पॉश रामदासपेठ असो की सर्वसामान्य नागरिकांचे बेलतरोडी रोडवरील रमानगर, दोन्ही ठिकाणी सिवेज लाइनवरील चेंबर अनेक दिवसांपासून उघडे आहेत. एवढेच नव्हे शहराच्या दाट वस्तीच्या मोमीनपुरा भागात सिवेज लाइनचे घाण पाणी रस्त्यांवर वाहत आहे. शहराच्या इतर भागातील मोकळ्या भूखंडांवर डबकी साचली आहेत. याशिवाय झुडपंही वाढली असून डासांना पोषक वातावरण तयार झाले आहे. एकूणच संपूर्ण शहरातच डासांचा प्रकोप वाढला आहे. सिवेज लाइनचे सांडपाणी, डबके, झुडपांमुळे मलेरियाच्या डासांचा प्रकोप वाढला आहे.

डास निर्मितीस्थळ -

उत्तर नागपुरातील गरीबनवाजनगर, दक्षिणेतील अमरनगर, लवकुशनगर, पश्चिम भागातील हजारीपहाड परिसर, मध्य नागपुरातील बांगलादेश, पूर्वेतील विजयनगर, सूर्यनगर, दक्षिण-पश्चिममधील सोनेगाव वस्ती, तलाव परिसर

सर्वात जास्त धोका -

बेलतरोडी रोडवरील रमानगरात सहा ते सात फूट खोल सिवेज लाइनचा खड्डा असून गेल्या अनेक दिवसांपासून उघडा असल्याने हा परिसर डास निर्मिती केंद्र झाला आहे. याच रमानगरात एकाच दिवशी सहा डेंगीचे चिमुकले रुग्ण आढळून आले.

फॉगिंग केवळ औपचारिकताच -

महापालिकेने डेंगीच्या नियंत्रणासाठी फॉगिंग करण्याची केवळ औपचारिकताच पूर्ण केली. अनेक वस्त्यांमध्ये अद्यापही फवारणी किंवा फॉगिंग मशिनचा वापर नाही. डेंगीचे रुग्ण आढळल्यानंतरच फवारणी केली जात असल्याने महापालिका तसेच नगरसेवक डेंगीने नागरिक ग्रस्त व्हावे, याची प्रतीक्षा करीत आहेत काय? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

दहा दिवसांत ८० डेंगीचे रुग्ण -

१ ते १३ जुलैपर्यंत ८२ रुग्ण आढळल्याचे मलेरिया-फायलेरिया अधिकारी दीपाली नासरे यांनी सांगितले होते. आज त्यांनी ‘सकाळ'सोबत बोलताना शहरात २३ जुलैपर्यंत १६२ रुग्णांची नोंद करण्यात आल्याचे सांगितले. अर्थात गेल्या दहा दिवसांत ८० डेंगीचे रुग्ण आढळून आले.

गेल्या दीड वर्षांपासून सर्वच कर्मचारी कोविड नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर होते. त्यामुळे नियमित फवारणी, फॉगिंग मशिनच्या वापरावर परिणाम झाला. डेंगीचे डास स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनीही घरात स्वच्छता पाणी साठवू नये. तसेच ते नियमित बदलणे गरजेचे आहे.
- दीपाली नासरे, मलेरिया, फायलेरिया अधिकारी, मनपा.
सर्वप्रथम माझ्या मुलाला डेंगी झाल्यानंतर महापालिकेला कळविले. त्यांनी परिसरात आणखीही ठिकाणी तपासणी केली असता चार ते पाच मुले डेंगीने ग्रस्त आढळले. त्यानंतर महापालिकेने फवारणी, फॉगिंग मशिनने धूर उडविला. रुग्ण आढळून येण्यापूर्वी मात्र काहीच केले नाही
-प्रशांत मेश्राम, रमानगर निवासी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com