Nagpur Property Tax : नागपूरकरांच्या खिशाला कात्री लागणार? निवडणूक होताच मनपा मालमत्ता कर वाढण्याच्या तयारीत

Nagpur Property Tax Hike After Elections : हा प्रस्ताव सभागृहापुढे मांडण्यात येणार असून, करवाढीचा निर्णय घेण्याचे मोठे आव्हान नगरसेवकांसमोर असणार आहे. त्यामुळे करवाढीचा प्रस्ताव सभागृह मंजूर करणार की फेटाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Nagpur Property Tax Hike After Elections

Nagpur Property Tax Hike After Elections

esakal

Updated on

नागपूर : मर्यादित उत्पन्न आणि वाढत्या खर्चाच्या कात्रीत सापडलेल्या नागपूर महानगरपालिका प्रशासनाने आगामी अंदाजपत्रकासाठी करवाढीचे संकेत दिले आहेत. हा प्रस्ताव सभागृहापुढे मांडण्यात येणार असून, करवाढीचा निर्णय घेण्याचे मोठे आव्हान नगरसेवकांसमोर असणार आहे. त्यामुळे करवाढीचा प्रस्ताव सभागृह मंजूर करणार की फेटाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्राप्त माहितीनुसार दिवसेंदिवस शहराचा अवाका वाढण्यासोबतच नागरी सुविधांच्यादृष्टीने मनपाकडून विकासकामेही मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येत आहे. या सर्वांसाठी पैसाही लागतो आहे. अशातच गेल्या दहा वर्षांपासून मालमत्ता करात कोणतीही वाढ झालेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com