esakal | माहिती लपवित असल्याने महापालिकेने उचलले कठोर पाऊल; तब्बल इतक्‍या नागरिकांसोबत करणार असं...
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Municipal Corporation took strict action due to corona

सतरंजीपुरा परिसर कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारीत आहेत. परंतु, अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली आहे.

माहिती लपवित असल्याने महापालिकेने उचलले कठोर पाऊल; तब्बल इतक्‍या नागरिकांसोबत करणार असं...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात हॉट स्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरात सोमवारी सायंकाळी तणाव निर्माण झाला होता. येथील नागरिक माहिती लपवीत असल्याने महापालिकेचे पथक नागरिकांना वीलगीकरणासाठी घेऊन जाण्यासाठी आले होते. अधिकाऱ्यांना विरोध केल्याने त्यांना सक्तीने वीलगीकरण कक्षापर्यंत घेऊन जाणाऱ्या बसमध्ये बसविण्यात आले. जवळपास तीस बसमध्ये पाचशेवर नागरिकांना वीलगीकरणात पाठविण्यात आले. 

सतरंजीपुरा येथील नागरिक अद्यापही माहिती लपवित असल्याने महापालिकेने कडक धोरण स्वीकारले आहे. तेथील बहुतांश लोकांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत विलगीकरण करण्यात येणाऱ्या नागरिकांचा आकडा अंदाजे 1200च्या घरात पोहोचेल, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

जाणून घ्या - या शहरातील एकाच भागात आढळले पुन्हा 13 पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या 47

सतरंजीपुरा परिसर कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारीत आहेत. परंतु, अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कातील सुमारे 200वर नागरिकांनीही अशीच माहिती लपविली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला. 

त्यातीलच पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा ऐंशीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात, ही शक्‍यता नाकारता येत नाही. आताच उपाययोजना केल्या नाही तर संसर्गाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच तेथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. आतपर्यंत येथील पाचशेवर नागरिकांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली आहे. आज यात आणखी पाचशेवर नागरिकांची भर पडली.

हेही वाचा - सकाळीच दुधाच्या कॅनसह पडायचा बाहेर; गावकऱ्यांना संशय आल्याने अघडकीस आला हा प्रकार...

संगमनगर परिसर सील

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आशीनगर झोनमधील प्रभाग तीन येथील संगमनगर परिसर महापालिकेने सील केला. नागरिकांना दक्षिण- पश्‍चिमकडील विटाभट्टी चौक, दक्षिणेकडील वांजरा पूल, उत्तर-पश्‍चिमेस नंदी चौक रिंग रोड, उत्तरेकडे यशोधरानगर परिसरात ये-जा करता येणार नाही. या परिसरातील नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. 

loading image
go to top