'वॉटर प्लस'प्रकरणी नागपूर महापालिका देणार केंद्राच्या निकालाला आव्हान

Nagpur NMC
Nagpur NMCe sakal
Updated on

नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्यात येत आहे. एवढेच नव्हे महापालिकेला (nagpur municipal corporation) उत्पन्नही मिळत आहे. परंतु, केंद्र सरकारच्या नगर व गृहनिर्माण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे ‘वॉटर प्लस’ सर्टीफिकेट (water plus certificate) मिळण्याबाबत महापालिकेचा अपेक्षाभंग झाला. परिणामी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत होणाऱ्या मूल्यांकनावरही परिणामाची शक्यता बघता मनपाने या गुणांकनाला आव्हान देण्याची तयारी केल्याचे सुत्राने नमुद केले.

Nagpur NMC
बस व ट्रकचा भीषण अपघात; एक जागीच ठार, २५ जखमी

नगरविकास विभागाच्या वतीने महापालिकेला ओडीएफ प्लस प्लस हा दर्जा मिळाला होता. त्यामुळे वॉटर प्लस सर्टीफिकेशनसाठी महापालिका पात्र ठरली होती. महानगरपालिकेने ओडीएफ प्लस प्लस हे प्रमाणपत्र आधीच मिळवले असून त्यानंतरच्या सर्वेक्षणांमध्ये कायम राखले असल्याने हे वॉटर प्लस सर्टीफिकेशन सहज मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, महापालिकेच्या पदरी निराशा पडली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या श्रेणीत महापालिकेने ७०० पैकी ५०० गुण मिळवले. यामध्ये केवळ नवी मुंबई महापालिका हे सर्टीफिकेशन मिळवणारी राज्यातील एकमेव महापालिका ठरली आहे. राज्यातील १३ महापालिकांनी पात्रता सिद्ध केली होती. वॉटर प्लसच्या सर्टीफिकेशनच्या संदर्भातील निकालांची घोषणा गेल्या आठवड्यात करण्यात आली. दरम्यान या निकालाला महानगरपालिकेच्या वतीने आव्हान देण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात दररोज ५०० एमएलडी सांडपाण्याची निर्मिती होती. त्यापैकी ३२० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. यातून महापालिकेला दरवर्षी ६० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर महानिर्मितीच्या दोन वीज प्रकल्पांसाठी करण्यात येतो. इतक्या मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचा वापर होत असल्याने महापालिकेला वॉटर प्लस श्रेणीत सर्टीफिकेट मिळणे अपेक्षित होते. आता महापालिकेने या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी केली. स्वच्छ भारत मिशनच्या महाराष्ट्र कार्यालयात गुणांकनाच्या बाबत आव्हान देण्यात येईल, असे सुत्राने नमुद केले.

जीर्ण सिवेज लाईनमुळे गमावले सर्टिफिकेट -

नगरविकास विभागाच्या निकालानुसार महापालिकेला सांडपाण्याच्या पुर्नवापराच्या संदर्भात एकूण गुणांच्या केवळ ३ टक्के गुण आहेत. सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, त्यांची देखभाल व दुरुस्ती आदी विभागांमध्ये महापालिकेला शून्य गुण मिळाले आहे. याशिवाय नाल्यांमध्ये वाहून जाणारा कचरा रोखण्यात, नाल्याचे प्रवाह सुरळीत ठेवण्यात अपयश आल्याने गुणांकनावर त्याचा परिणाम झाला. दरम्यान ओडीएफ प्लस प्लस श्रेणीत केंद्राच्या चमूने केलेल्या ३९ सार्वजनिक शौचालयांच्या पाहणीत चांगले गुण मिळवण्यात पालिकेला यश आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com