
“Nagpur Municipal Election 2025: Inflation pushes cost to ₹20 crore, with over 24 lakh voters ready to cast their votes.”
Sakal
-तुषार पिल्लेवान
नागपूर : जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले की सामान्य नागरिकांमध्ये असंतोष दिसून येतो. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असताना आता त्याचा फटका नागपूर महानगरपालिकेलाही बसणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाला यापूर्वीच्या तुलनेत तब्बल अडीच पटीने जास्त खर्च करावा लागणार आहे.